जालना आंतरवाली सराटी येथील घटनेच्या निषेधार्थ कोपरगावमध्ये कडकडीत बंद,
Strict shutdown in Kopargaon to protest the incident at Jalna interwali Sarati.
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onMon 4Sep24,19.40Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : आंतरवाली सराटी (जि.जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ सोमवारी (दि.४) कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सोमवार आठवडे बाजार असतानाही व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना सराटी येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात अनेक महिला, पुरुष व लहान मुले जखमी झाली. या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी कोपरगाव बंदची हाक दिली होती .सकाळपासून सर्व दुकाने बंद एसटी बसेस, शाळा, महाविद्यालये बंद होती. शांततेच्या मार्गाने बंद पाळण्यात आला . बँका पतसंस्था व वैद्यकीय सेवा चालू होत्या.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व पक्षीय ठिय्या आंदोलन करण्यात आले. येथे झालेल्या सभेत माजी आमदार अशोक काळे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष ॲड संदीप वर्पे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, भायुमो तालुकाअध्यक्ष विक्रम पाचोरे, शहर प्रमुख सनी वाघ, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे ॲड. योगेश खालकर यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या तहसिलदार संदीप भोसले व शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांना मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या सराटी येथील आंदोलकावर लाठी हल्ला व अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर व दोषीवर कडक कारवाई करावी तातडीने मराठा आरक्षण देण्यात यावे त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी आंदोलकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे अशा मागणींचे निवेदन विजय वहाडणे, प्रमोद लबडे, विक्रम पाचोरे, सनी वाघ, राजेंद्र झावरे ॲड. योगेश खालकर विजय आढाव बाळासाहेब नरोडे अनिल गायकवाड सुनील गंगुले विनय भगत योगेश हवलदार किशोर डोके अमित आढाव कृष्णा आढाव मुकुंद इंगळे चंद्रशेखर मस्के परसराम नरोडे मनोज संदीप देवकर मनोज नरोडे अनिरुद्ध काळे कवडे , अनिल सोनवणे, कलविंदरसिंग दडियाल, बाळासाहेब साळुंके, इरफान पठाण, राहुल सूर्यवंशी,आदी सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी दिले तहसीलदार भोसले यांनी आपल्या भावना आमच्याकडे पोहोचले आहे त्या शासनाकडे पोहोचव असे आश्वासन दिले
Post Views:
194