यशस्वी माजी विध्यार्थी हा संजीवनीचा अभिमान- सुमित कोल्हे

यशस्वी माजी विध्यार्थी हा संजीवनीचा अभिमान- सुमित कोल्हे

   A successful alumni is the pride of Sanjeevi- Sumit Kolhe

 संजीवनी सैनिकी स्कूलच्या दोन माजी विध्यार्थ्यांचा  सत्कारTwo ex-students of Sanjeevani Sainiki School felicitated

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 5Sep24,20.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांवः ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षा देवुन लष्करी  अधिकारी व्हावे किंवा इतर शासकिय सेवेत जावुन देश  सेवा करता करता स्वावलंबी बनुन आई वडीलांच्या महत्वाकांक्षा पुर्ण कराव्यात,या हेतुने माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी २००० साली संजीवनी सैनिकी स्कूल अँड  ज्युनिअर कॉलेजची स्थापना केली. हा हेतु यापुर्वीच्या अनेक माजी विध्यार्थ्यांसारखाच अलकिडे माजी विध्यार्थी गणेश  रोहिदास सदगीर याने तालुका कृषि  अधिकारी बनुन तर प्रविण शिवाजी  वरे याने इंडियन नेव्हीत ऑफिसर बनून  पुर्ण केला. अशा  माजी विध्यार्थ्यांचा संजीवनीला अभिमान आहे,’ असल्याचे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी केले.

 सदर प्रसंगी डायरेक्टर (नॉन अकॅडमिक) श्री ज्ञानदेव सांगळे, प्राचार्य डॉ. जी. बी. गायकवाड, उपप्राचार्य श्री कैलास दरेकर, पालक श्री रोहिदास सदगीर, शिक्षक  व विध्यार्थी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.
      प्रारंभी प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी सर्वांचे स्वागत करून  स्कूल व ज्यु. कॉलेजच्या काही निवडक माजी विध्यार्थ्यांची यशोगाथा  उपस्थित विध्यार्थ्यांना सांगुन त्यांनी राष्ट्रीय  व आंतरराष्ट्रीय  पातळीवर स्थापित केलेले किर्तिमान विषद  केले.
           सुमित कोल्हे  पुढे म्हणाले की संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली  स्कुल व ज्यु. कॉलेज मधिल विध्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण  व स्पर्धात्मक परीक्षांच्या ज्ञानाबरोबरच त्यांच्यात बहुआयामी व्यक्तीमत्व विकसीत करण्यासाठी क्रीडा, संगीत, कला, इत्यादी क्षेत्रातील ज्ञान व प्रशिक्षण  देण्यासाठी संस्थेने प्रत्येक क्षेत्रातील निपुणता प्राप्त ट्रेनर्सची  नेमणुक केली आहे. या सर्व बाबींमुळे या संस्थेतील विध्यार्थी वेगळेपण सिध्द करीत आहे. संस्थेच्या माजी विध्यार्थ्यांची ‘माजी विध्यार्थी संघटना’  स्थापन करून त्यांचे लवकरच एक स्नेह संमेलन घेण्यात येईल, असे सांगुन दोनही माजी विध्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
         सत्कारास उत्तर देताना गणेश  म्हणाला की खर तर युपीएससी अथवा एमपीएससी या पदवी प्राप्त केल्यानंतर देण्याच्या स्पर्धात्मक परीक्षा आहेत. परंतु या परीक्षांचे बाळकडू आणि गोडी संजीवनी सैनिकी स्कूलमधुनच मिळाली. तेव्हापासुनच पॅटर्न काय राहतो, अभ्यासक्रम कसा असतो याची जाणिव झाली होती. तेव्हा पासुनच्या माझ्या अंगातील या विचारांच्या संचाराने मी माझे स्वप्न पुर्ण करू शकलो. दुसरा सत्कारार्थी प्रविण म्हणाला की येथे शिकत  असताना सैन्य दलातील विविध अधिकाऱ्यांची  आयोजीत केलेली भाषणे ऐकुन तेव्हापासुनच मनात खुणगाठ बांधली होती की मला लष्करी  अधिकारीच व्हायचे. खर म्हणजे कोणत्याही व्यक्तीच्या भावी आयुष्याची  मुहूर्तमेढ ही शालेय  जीवनातच अधिक परीणामकारक ठरत असते. ती संजीवनीतुन झाली याचा मला आनंद आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  आण्णासाहेब थोरात यांनी केले तर श्री दरेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page