कोपरगाव शहराला २०२४ ला नियमित पाणी पुरवठा होईल -आ.आशुतोष काळे

कोपरगाव शहराला २०२४ ला नियमित पाणी पुरवठा होईल -आ.आशुतोष काळे

Kopargaon city will have regular water supply by 2024 – Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 5Sep24,20.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव: पाणी प्रश्नासाठीच्या १३१.२४ कोटी निधीतील ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हे काम पूर्ण होवून २०२४ ला निश्चितपणे कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा होईल असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी ब्राह्मण समाज दहावी बारावी व इतर विषयातील गुणवंतांच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केला.सर्वधर्मसमभाव जोपासताना इतर समाजाप्रमाणेच ब्राम्हण समाजाला न मागता देखील सामाजिक सभागृहासाठी निधी दिला असून अजूनही निधी देण्यासाठी प्रयत्न करू. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कोपरगाव शहरातील श्रीरामनगर येथे ब्राह्मण समाज सामाजिक सभागृहासाठी आ. आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रुपये निधी दिला

आ आशुतोष काळे पुढे म्हणाले की, पूर्वीपासून ब्राम्हण समाज विद्वान समजला जातो त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ब्राम्हण समाजातील व्यक्ती उच्च पदावर कार्यकर्त आहे हि अभिमानास्पद बाब आहे. काळे परिवाराचे इतर समाजाप्रमाणेच ब्राम्हण समाजाशी जिव्हाळ्याचे सबंध आहेत. कोपरगाव शहरात शासकीय इमारती, विविध रस्ते, शहर सुशोभीकरण अशी बहुतांशी विविध विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे सुरु आहेत. निवडणूक प्रचारावेळी शहरातील नागरिकांच्या घरासमोरील पाण्याच्या असंख्य टाक्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निश्चय केला होता. केलेला निश्चय पूर्ण होवून मागील अनेक वर्षापासूनचा ज्वलंत पाणी प्रश्न येत्या काही दिवसात कायमचा सुटणार असून त्यामुळे मला माता भगिनींचे आशीर्वाद मिळाले याचे मोठे समाधान वाटते. विविध विकासकामे पूर्ण करून नागरिकांचे जीवन कसे सुखकर होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

आ. आशुतोष काळे तुम्ही पुन्हा येणार——-

चौकट :- ब्राह्मण समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी निधी दिला मात्र आम्हाला तुम्ही न मागता वेळेवर निधी दिला त्यामुळे तुमचा निधी आमच्यासाठी विशेष आहे. मी पुन्हा येणार हे वाक्य ब्राम्हण समाजात मोठे प्रचलित आहे.आ.आशुतोष काळे यांनी केलेली विकास कामे पाहता मी पुन्हा येणार हे वाक्य त्यांना साजेसे आहे. आ. आशुतोष काळे करीत असलेले काम प्रत्येक क्षेत्रात असून तुम्ही पुन्हा येणार याची संपूर्ण मतदार संघ ग्वाही देत आहे.- उद्योजक प्रसाद नाईक

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ब्राह्मण सभा कोपरगावचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, उपाध्यक्ष गोविंद जवाद, अॅड.जयंत जोशी, बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, संदीप देशपांडे, सदस्य जयंत बडवे, योगेश कुलकर्णी, महेंद्र कुलकर्णी, गौरीश लहूरकर, सुधाकर कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा सौ.ऐश्वर्या सातभाई, प्रसाद नाईक, वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, डॉ. मिलिंद धारणगावकर, अनिल कुलकर्णी, अॅड. श्रद्धा जवाद, सौ. वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव कुलकर्णी, सुभाष महाजन, प्रसाद नाईक आदींसह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, वाल्मिक लहिरे, राजेंद्र खैरनार, ऋषीकेश खैरनार, ॲड. मनोज कडू, प्रकाश रुईकर, नारायण लांडगे, विकी जोशी, समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page