नांदूर मध्यमेश्वर बंधा-यातुन गोदावरी नदीत २४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग   

नांदूर मध्यमेश्वर बंधा-यातुन गोदावरी नदीत २४ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

24 thousand cusecs of water released into Godavari river from Nandur Madhyameshwar Dam

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 9Sep24, 20.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : तालुक्यात दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर परतीच्या पावसाने शेतक-यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ११ ते ४ पाउस ब-यापैकी झाला. नाशिक ईगतपुरी भागात दमदार पाउस झाल्याने नांदुर मध्यमेश्वर बंधा-यातुन गोदावरी नदीत शनिवारी पहाटे २४ हजार ५७९ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यांत आला होता. आज पावसाने उघडीप दिली मात्र ढगाळ हवामान दिवसभर होते,नाशिक ईगतपुरी भागात ८ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढील प्रमाणे तर कंसातील आकडे एकुण पाउस दर्शवितात.

             दारणा ८२ (७७८), गंगापुर ३९ (७५९), ईगतपुरी ९३ (२८७५), त्रंबकेश्वर १५५ (१०५७), नाशिक १०१ (४०५), नांदुर मध्यमेश्वर ३५, देवगांव ३२ (२७२), ब्राम्हणगांव ३० (२१७), कोपरगाव २५ (१०४) पढेगांव २७ (१०३), सोमठाणे ३२ (११९), कोळगांव ३ (१८३), सोनेवाडी १७ (१६४), शिर्डी १२ (७३), राहाता १४ (१७०), राजणगाव खुर्द ७, चितळी १५ (१२४), तर धरण कार्यक्षेत्रात वाकी ४१ (१३२९), भाम १०७ (१७३६), भावली ४४ (३७४७), वालदेवी ७५(४८७), काश्यपी ७६ (८२०), गौतमी ९८ (१०७५), कादवा ६२ (६५५), आळंदी २५, पालखेड ५३(२१९) याप्रमाणे पाउस झाला आहे. 
          तर दारणेत ६८८३, गंगापुर ५३५०, मुकणे ६११४, वाकी १७८३, भाम २४६४, भावली १४३४. वालदेवी ११३३, काश्यपी १४४०, गौतमी १४१३. पालखेड ५३३ दशलक्ष घनफुट पाण्याचा साठा झाला आहे. दोन महिने पावसाने विश्रांती घेतल्याने नाशिक नगर परिसरात पाणीबाणी सुरू झाली होती. शेतकरी हवालदिल झाले होते. जुन महिन्यात पाउस काही प्रमाणांत बरसला त्यावर खरीप पिकाची पेरणी शेतक-यांनी केली पण पिकाच्या वाढीसाठी पाउसच न झाल्याने शेतक-यांच्या हातुन खरीप पिक गेले व त्यांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने यावर्षीपासुन एक रूपयात पीक विमा काढला आहे त्याबददल शासनाने अग्रीम २५ टक्के नुकसान भरपाई देण्याचे कंपन्यांना आदेश केले आहेत. रब्बी पिकाची शेतक-यांना आशा आहे पण पाउस झालाच नाही तर रब्बी हंगामही शेतक-यांच्या हातुन जाणार आहे.
             दिवाळी एक महिन्यावर येउन ठेपला आहे. गणपती नवरात्र उत्सवावर दुष्काळाचे सावट आहे. शेतक-यांच्या हाती खरीपाचे पैसे न आल्याने बाजारही मंदित राहणार आहे. मागील गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसापोटी काही रक्कम मिळाली तर शेतकरी रब्बी पिक घेऊन छोटयाशा प्रमाणांत दिवाळसण साजरा करतील अन्यथा परिस्थिती अवघडच राहणार आहे. बारमाही गोदावरी कालवे न वाहिल्यामुळे परिसरातील विहीरींनाही पाणी नाही. शेतक-याकडील पशुधन कसे जगवायचे हा प्रश्न आहे. पडलेल्या पावसाने छोट्या-मोठ्या झाडांना पाणी मिळाल्याने ते चांगलेच बहरले आहेत,हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचेही ताबूत सध्या थंड झालेले आहेत.                                                                              

Leave a Reply

You cannot copy content of this page