तीन जणांच्या तोंडावर विषारी स्प्रे मारून जखमी केले; दोघं विरुद्ध गुन्हा दाखल, अटक
Three persons were injured by poisonous spray in the face; A case was filed against both, arrested
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat 9Sep24, 19.40Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सांगवी भुसार येथील मेहेरखांब कुटुंबातील तीन जणांना लाथा बुक्क्याने मारून शिवीगाळ करून तोंडावर कोणता तरी विषारी स्प्रे मारून जखमी केल्याची घटना घडली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याची तक्रार फिर्यादी दादा सखाराम मेहरखांब (73) राहणार सांगवी भुसार यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील सांगवी भुसार येथील फिर्यादीचा मुलगा हा प्रशांत दादा मेहेरखाबं शनिवारी (दि 9) रोजी सकाळी सात वाजता त्यांच्या घरासमोरील रस्त्यावरून हा आरोपी सोमनाथ छगन वाहुळ व अमोल छगन वाहुळ यांना तुम्ही माझ्या घरी येऊन माझ्या आई-वडिलांना व पत्नीला शिवीगाळ करून धमकी का दिली असे विचारण्यास गेला असता वरील वाहुळ बंधूंनी त्याला फावड्याने मारहाण केली तसेच प्रशांत दादा मेहेरखाब, पुंडलिक सखाराम मेहरखांब, व दत्तात्रय दादा मेहेरखांब या तिघांच्या तोंडावर काहीतरी विषारी द्रव्याने स्प्रे मारून त्यांना जखमी केले, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली, शिवीगाळ केली, लाथा बुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान यातील पुंडलिक मेहरखांब व दत्तात्रय मेहेरखांब या दोघांवर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर प्रशांत मेहेरखांब याला अंधुक दिसत असल्यामुळे व बोलताना त्रास होत असल्यामुळे त्याला शिर्डी साई रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी
आरोपी सोमनाथ छगन वाहुळ व अमोल छगन वाहुळ या दोन भावांना अटक केली आहे तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप बोठे पुढील तपास करीत आहेत.
Post Views:
120