संजीवनी  कॉलेज ऑफ आयुर्वेदातर्फे  जनतेसाठी मोफत फिरता दवाखाना 

संजीवनी  कॉलेज ऑफ आयुर्वेदातर्फे  जनतेसाठी मोफत फिरता दवाखाना 

Free mobile clinic for public by Sanjeevani College of Ayurveda

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 13Sep24, 16.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव – गावागावांमध्ये दर्जेदार मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्धार  संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा व रिसर्च सेंटरने केला आहे.यांच्या सहकार्याने सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे  फिरता दवाखाना सुरू करण्यात आला. तालुक्यातील रवंदा येथे साहेबराव कदम यांच्या हस्ते या सेवेला प्रारंभ करण्यात आला. परिसरातील अनेक गावांना या सेवेचा लाभ होणार आहे.या उपक्रमाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

उत्तम आरोग्य हे आनंदी जीवनाचे एक रहस्य असते.  वाड्या- वस्त्या, तांडे, गांव खेडयातील लोकांचे, विशेषत: वयोवृध्द आर्थिकदृष्ट्या पिछाडीवर असलेल्या लोकांचे आरोग्यमान सुधारणे यासाठी  वैद्यकिय उपचारांची सेवा देण्यांत शंकरराव कोल्हे आर्युवेद महाविद्यालय कटीबध्द असल्याचे साहेबराव कदम यांनी सांगितले.
त्यासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष  बिपीन कोल्हे व  संजीवनी शैक्षणिक चे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून संजीवनी युवा प्रतिष्ठान व संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा व रिसर्च सेंटरने परिसरातील गावांना नियमित अखंडपणे आरोग्यसेवा देण्यासाठी  फिरत्या दवाखान्याची जबाबदारी घेतली  आहे. सर्व खर्च आयुर्वेद महाविद्यालय उचलणार आहे.
फिरत्या दवाखान्यात अनुभवी एमबीबीएस डॉक्टर, नर्स  असेल. गरजू रुग्णांची माेफत तपासणी, मोफत औषधे, तसेच इतर उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. चिंताजनक आजार असतील, तर संबंधित रुग्णाला योग्य मार्गदर्शन करून पुढील उपचारांसाठी संबंधित रुग्णालयाशी संपर्क करून दिला जाणार आहे. 
रवंदा येथे कदम यांच्या हस्ते या सेवेला प्रारंभ करण्यात आला. कदम म्हणाले, प्रत्येक नागरिकाने आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संजीवनी कॉलेज ऑफ आयुर्वेदा  महाविद्यालयाने सुरू केलेला मोफत आरोग्य सेवेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. यावेळी  उपसरपंच संदिप कदम, केशवराव कंक्राळे, भिमराव भुसे, आबासाहेब खोंड, शंकरराव काळे, संजय काळे, आण्णासाहेब घायतडकर, मच्छिंद्र लामखडे, अरूण सोनवणे, प्रविण कदम, आदि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. सुजित सोनवणे यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वितरण केले. 
प्रास्ताविक बाजार समिती संचालक  साहेबराव लामखडे यांनी  केले. तर शेवटी आभार उपसरपंच संदीप कदम यांनी मानले

Leave a Reply

You cannot copy content of this page