साईसंजीवनी नागरी बँक उत्कृष्ट बँक पुरस्काराने सन्मानित
Sai Sanjeevani Nagari Bank honored with Outstanding Bank Award
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 13Sep24, 16.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : राज्यातील सहकार क्षेत्रात भरीव योगदान देत सहकार बळकट करणा-या साई संजीवनी नागरी बँकेला सन २०२१-२२ या वर्षीचा १०० कोटी ठेवीसह विविध आर्थिक निकषात सर्वोत्कुष्ट कामगिरी या गटातुन पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक विभागातून ही निवड झाली आहे. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते साई संजीवनी सहकारी बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लि मुबंईच्या २५व्या रौप्य महोत्सव पारितोषिक वितरण सभारंभ नाशिक येथे दि.९ रोजी पार पडला. प्रमुख पाहुणे खा. सुरेश प्रभू (माजी रेल्वे मंत्री तथा अध्यक्ष न्यू ड्राफ्ट पॉलीसी कॉ ऑप सहकार मंत्रालय), डॉ. भारती पवार (आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री), खा. हेमंत पाटील, डॉ. सुधीर महाजन (चीफ ए.आर एन सी यु आय. दिल्ली), अजय ब्रमहेचा (अध्यक्ष महाराष्ट्र अर्बन कॉ ऑफ बँक्स फेडरेशन मुबंई), डॉ. श्रीमती शशिताई अहिरे (अध्यक्ष सहकार भारती), सुभाष गुप्ता (एन सी यु आय), सुमित मिश्रा (एन सी यु आय दिल्ली), राज्य सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर आदी मान्यवराच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सुरेश प्रभू म्हणाले, भविष्यात सहकार क्षेत्राला प्रगतीकडे नेण्यासाठी सहकारातील मार्गदर्शक तत्त्व अवलंबण्याची गरज असून, काळाबरोबर बदलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे तितकेच महत्त्वाचे आहे. ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर नाते जोडून बँकांनी ग्राहकाभिमुखता व सहकारातील सात्विकता जपावी,
राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे म्हणाले, सहकाराची पारदर्शकता, विश्वासार्हता आणखी गतीमानतेने वाढवण्यासाठी नागरी बँकांनी व्यवस्थापनातील सिद्धता, कौशल्य विकास, मूल्य व्यवस्था, सामाजिक योगदान, सामाजिक दायित्व यांचा अंगीकार करावा.
विवेक कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे त्यांनी भविष्याचा वेध घेऊन ग्रामीण अर्थकारण मजबूत करण्याच्या दृष्टीने व शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देत त्यांचे जीवन समृद्ध करून सभासद, ठेवीदार, शेतकरी हितचिंतकांच्या विश्वासाने या बँकेला प्रगतीच्या शिखराकडे नेले.
संजीवनी उद्योग समूहाचे बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार हा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. हा पुरस्कार संचालक मंडळ, सभासद, ग्राहक, बँकेचे अधिकारी यांच्या सांघिक कामगिरीमुळे मिळाला असल्याचे बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले.
हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष विवेक कोल्हे , उपाध्यक्ष बँकेचे रेवजी आव्हाड, संचालक संभाजी रक्ताटे, जयंतीलाल पटेल, बापूसाहेब बारहाते, गोरखनाथ आहेर, तज्ज्ञ संचालक अशोकराव टुपके, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर सभारंजक यांनी स्विकारला.
पुरस्कारार्थींच्या वतीने अरविंद पोरेड्डीवार, कमलादेवी विजयकुमार राठी, शरण बसवराज पाटील आदींची मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी तर स्वागत पाध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चंद्रकांत संकलेचा, मंगेश पंचाक्षरी व डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. असोसिएशनचे संचालक राजेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले.
Post Views:
97