कोपरगावमध्ये दोन घरफोडी करून दिड लाखांचा ऐवज लंपास
Two houses were burglarized in Kopargaon and looted of one and a half lakhs
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun 10Sep24, 18.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातील अंबिका नगर येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना रविवारी (ता. १०) रोजी घडली आहे. बंद घराचा फायदा घेत चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला आहे.
दत्तात्रय चोरगे हे खाजगी नोकरीत कार्यरत आहेत. तर गरिमानगरी अंबिका नगर येथे राहणारे रमेश भोसले या दोन्ही घरांचे अज्ञात चोरट्याने रविवारी (दि१०) रोजी रात्री दोन अडीच वाजता याचदरम्यान चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. चोरट्याने सोन्याचे दागिने, चांदीचे नाणे, रोकड असा दोन्हीकडे मिळून एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याबाबत कोपरगाव व शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व सपोनी.येसेकर यांनी भेट दिली आहे.
दत्तात्रेय चोरगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई रोहिदास ठोंबरे तपास करीत आहेत.
Post Views:
134