गोदावरीचे जल शरयू जलाच्या भेटीला अयोध्याला रवाना
सहा हजार वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा
वृत्तवेध ऑनलाईन । 28 July 2020, 21 :45
By: Rajendra Salkar

कोपरगाव : अयोध्येत ५ ऑगस्टला राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी होणाऱ्या अभिषेकासाठी गोदावरी नदीचे जल पाठविण्यात आले आहे.
रामायणाची कथा सहा हजार वर्षे जुनी असू शकते. या महाकाव्याची घटना हिंदू कालगणनेच्या तिसऱ्या युगात त्रेतायुगात (सत्ययुगात) घडली. सहा हजार वर्षांपूर्वी प्रभू श्रीरामचंद्र दंडकारण्यात आले होते तेंव्हा ते गोदावरी नदीच्या सान्निध्यात पंचवटीत राहिले होते. आजही त्या पौराणिक खुणा आहेत. गोदावरीत नदीत प्रभू श्रीरामचंद्रानी स्नान केले ते रामकुंड आहे. गोदावरी नदीचे पाणी अयोध्येत राम जन्मभूमी येथे मंदिराच्या भूमिपूजन प्रसंगी होणाऱ्या अभिषेकासाठी वापरले जाणार आहे. त्याचवेळी अयोध्येतील सरयू नदीतील पाणी अभिषेकासाठी वापरले जाईल. यामुळे रामायण काळात प्रभू श्रीरामचंद्रानी सीतामाता व लक्ष्मण यांच्यासह बराच काळ दंडकारण्यात गोदावरी नदीचा उगम त्रंबकेश्वर येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोदावरी नदीच्या सान्निध्यात नाशिक पंचवटी येथे व्यतीत केला. सीता सरोवर, राम कुंड, त्र्यम्बकेश्वर आदि खुणा याची साक्ष देता. सीतेचे हरण झाले, तेही इथे आज कोपरगावच्या गोदावरीचे जल अयोध्याला राम जन्मभूमी येथे मंदिर भूमिपूजनासाठी जाणार असल्याने प्रभू श्री रामचंद्र गोदावरी नदी यांच्या नात्याला अर्थात सहा हजार वर्षांपूर्वीच्या घटनेला उजाळा मिळणार आहे. गोदावरी नदीचे पाणी शरयू नदीच्या भेटीला हे भाग्य कोपरगावकर यांच्या वाटेला आले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पार्टी कोपरगाव यांच्यावतीने सुदर्शन चैनल चे अध्यक्ष सुरेश चव्हाणके शिर्डी येथे आले असता त्यांच्या यांच्याकडे एका कलशामध्ये पवित्र गोदावरीचे पाणी मंगळवारी (२८ जुलै) रोजी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे.
भूमिपूजन कार्यक्रमासाठी सुरेश चव्हाणके हे स्वतः उपस्थित राहुन गोदावरीचे पवित्र जल आयोजकांकडे सुपुर्द करणार आहेत.
गोदावरी नदीच्या पवित्र जलाचा कलश भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सेल चे सहसंयोजक समीर आंबोरे,भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे, मा.शहर सरचिटणीस चेतन खुबानी, बाळासाहेब वाघ,किरण थोरात, रमेश नागरे,बाळासाहेब जाधव,शुभम गायकवाड, रविंद्र वाघमारे तसेच संघ स्वयंमसेवक गणेश शिंदे,चेतन राणे आदि तरुण शिर्डीला घेवून गेले.
मा. नरेंद्र मोदी देशातील अनेक पवित्र अशा नदीच्या जलाबरोबर कोपरगांव येथील गोदावरीच्या पाण्याने अभिषेक करतील अशी माहिती समीर अंबोरे व चेतन खुबानी यांनी दिली.





