महिला आरक्षण विधेयक: हा मोदी सरकारकडून नारी शक्तीचा सन्मान -स्नेहलता कोल्हे

महिला आरक्षण विधेयक: हा मोदी सरकारकडून नारी शक्तीचा सन्मान -स्नेहलता कोल्हे

Women’s Reservation Bill: This is a tribute to Nari Shakti by Modi Govt – Snehlata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 20Sep24, 19.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : तब्बल तीन दशकापासून प्रलंबित असलेल्या महिला आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाल्याने महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळणार असल्याने हा मोदी सरकारकडून नारीशक्तीचा सन्मान तर आहेच परंतु महिला सक्षमीकरणाच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल असल्याच्या असल्याच्या भावना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केल्या.

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठीचे १२८ वे घटनादुरुस्ती विधेयक ‘नारीशक्ती वंदन अधिनियम २०२३’ या नावाने नवीन संसद भवनात होत असलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात मांडले आहे. महिलांना संसदीय राजकारणात समान संधी देण्याची तरतूद असलेल्या या विधेयकामुळे स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी आपल्या देशात समान संधीची पहाट होण्याची आशा पल्लवित झाली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळाला आहे. हे ऐतिहासिक विधेयक कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर देशाच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलणार आहे. महिला आरक्षणामुळे आपली लोकशाही आणखी मजबूत होईल.
या विधेयकामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सातत्याने निवडून येणाऱ्या आणि चांगली कामे करणाऱ्या महिलांना देश पातळीवर संधी मिळणार आहे. आरक्षणामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये वैचारिक बैठक निर्माण होऊन स्वतः निर्णय घ्यायची क्षमता निर्माण होणार आहे, महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी व केंद्रातील भाजप सरकारने राजकारणात महिलांना आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्यच आहे. असे स्नेहलता कोल्हे म्हणाल्या,

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याबाबतचा कायदा महाराष्ट्राने यापूर्वीच केलेला आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्के ‘महिला राज’ आधीपासूनच आहे. परंतु महिला आरक्षण विधायक मंजुरीचे क्रांतिकारी पाऊल उचलल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी मोदी सरकारचे तमाम महिलांच्या वतीने मन:पूर्वक आभार मानले आहेत.

चौकट
महाराष्ट्रातील महिला आमदारांची संख्या सध्या २५ इतकी असून, आता नारीशक्ती वंदन अधिनियमामुळे अर्थात ३३ टक्के महिला आरक्षणामुळे महाराष्ट्रात किमान ९५ महिला आमदार असतील. याचा अर्थ विधानसभेतील महिलांचा सहभाग जवळपास चार पटीने वाढणार आहे. विधानसभेत ३३ टक्के ‘महिला राज’ दिसेल.

Leave a Reply

You cannot copy content of this page