मोलाचे योगदान  असलेल्या  सहकारी सोसायट्या या गावच्या विकासाचा केंद्रबिंदू – विवेक कोल्हे

मोलाचे योगदान  असलेल्या  सहकारी सोसायट्या या गावच्या विकासाचा केंद्रबिंदू – विवेक कोल्हे

Vivek Kolhe was the focal point of the development of the village of Co-operative Societies with valuable contribution

 
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 21Sep24, 19.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असून, गावच्या विकासात त्यांचे मोलाचे योगदान आहे. गावातील शाळा, मंदिरे, सहकारी सोसायटी यावरून आपल्याला गावच्या विकासाची कल्पना येते. गावाच्या विकासात मोलाचे योगदान असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या या गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी बुधवारी कोळपेवाडी येथील एका कार्यक्रमात केले संचालक मंडळाने नियोजनबद्ध उत्तम कारभार करून गावच्या विकासाला हातभार लावावा,  असेही ते म्हणाले 

 यावेळी कोल्हे  कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे,  निवृत्ती पाटील कोळपे, अरुणराव येवले, संचालक राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे,  दत्तात्रय पानगव्हाणे, भास्करराव तिरसे, सोपानराव पानगव्हाणे, मोहनराव वाबळे, माजी सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे, मढी बु. येथील कारभारी बाबुराव गवळी सोसायटीचे चेअरमन नानासाहेब कारभारी गवळी, कुंभारी नं. १ सोसायटीचे चेअरमन अरुण पुंडलिक कदम, सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) एन. जी. ठोंबळ, जिल्हा सहकारी बँकेचे विकास अधिकारी ए. डी. काटे, राजेंद्र देशमुख, कोळपे  सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण भाऊसाहेब कोळपे, उपाध्यक्ष कारभारी नाथू कोळपे, संचालक भाऊसाहेब चांगदेव कोळपे, भिकाजी भागाजी कोळपे, वसंतराव हरिभाऊ लकडे, बाबासाहेब दारकू कोळपे, पाटीलबा बाळू धायगुडे, मारुती गुलाब गायकवाड, श्यामराव दलाजी जाधव, अशोक रामदास हळनोर, सुमनबाई निवृत्ती कोळपे, सिंधुबाई काशिनाथ मदने, मंगलबाई विजय नागरे, व्यवस्थापक भानुदास देवराम पानगव्हाणे, सागर ढोणे, सुनील धनवटे, डॉ. प्रकाश कोळपे, डॉ. सय्यद, सुनील देवकर, पंडितराव चांदगुडे, वाल्मीकअप्पा कोळपे, राहणे, पुंजाजी राऊत, विजय कदम, रावसाहेब मोकळ, सुखदेव कोळपे, शब्बीरभाई शेख, पोपटराव जुंधारे, अंबादास कदम, देवराम गवळी, शब्बीरभाई पटेल, परसराम वाबळे आदींसह संस्थेचे सभासद, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवभारत ग्रुपचा यंग प्रॉमिसिंग पॉलिटिशन ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल विवेक कोल्हे यांचा कोळपेवाडीकरांनी सत्कार केला.  
संस्थेची स्थापना चांगदेव बारकू कोळपे यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केले त्यानंतर सातत्याने सभासदांना इलेक्ट्रिक मोटर शेतीसाठी बियाणे खते पुरवून मोठी मदत केली दुष्काळात वडीवर अडीअडचणीच्या काळात सभासदांना कायम मदतीचा हात दिला रेशन दुकानामार्फत भरीव मदत केली या भागातील शेती सुजलाम सुफलाम करण्यात संस्थेचा मोठा मोलाचा वाटा आहे असे अध्यक्ष किरण कोळपे यांनी प्रास्ताविकात सांगितले
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. . ‘देशातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केलेली असून, या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सहकारी सोसायट्यांना देण्याचे सरकारचे नियोजन आहे. पी. एम. कुसुम योजनेअंतर्गत १३ कोटीहून अधिक शेतकरी जोडण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. नाबार्डच्या सहकार्याने बँक मित्र सहकारी संस्था तसेच मायक्रो एटीएम आपल्या संस्थेला सुरू करता येणार आहे. किसान क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होतात. विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या माध्यमातून पेट्रोल पंप, रिटेल आऊट लेट रूपांतर करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. जेनेरिक औषध केंद्राची परवानगीही मिळालेली आहे.
अनेक अग्रगण्य सहकारी संस्था कार्यरत होत्या. काळाच्या ओघात बऱ्याच संस्था अडचणीत आल्या. या संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही विवेक कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page