धारणगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संगीत नवनाथ कथेची आज सांगता
Sangeet Navnath story of Vitthal Rukmini temple in Dharangaon today
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 21Sep24, 19.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव: तालुक्यातील धारणगाव येथील श्री नवनाथ भक्तिमंडळ आयोजित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या संगीतमय नवनाथ कथेची सांगता आज शुक्रवारी (२२) रोजी करण्यात येणार अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.
शुक्रवार दिनांक (१५) रोजी पासून सायंकाळी सात ते नऊ वाजे दरम्यान सुरू असलेल्या श्री नवनाथ संगीतमय नवनाथ कथा स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज मठाधिपती, श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामाठाण, ता. श्रीरामपूर यांच्या अमृततुल्य वाणीतून सादर करण्यात आली.
सुत्रसंचालन ह.भ.प. गुरुदेव महाराज चव्हाण यांनी केले.
या संगीत नवनाथ कथा सप्ताहासाठी श्री नवनाथ भक्त मंडळ व कुंभारी, माहेगांव, टाकळी, सोनारी, मुर्शतपुर, हिगणी व चांदगव्हाण पंचक्रोशीतील भाविकांचे मोठे सहकार्य लाभले आहे





