कोल्हे कारखाना अ’ वर्ग  सहकारी संस्थांना शेअर्ससाठी अर्धी रक्कम देणार – बिपिन कोल्हे

कोल्हे कारखाना अ’ वर्ग  सहकारी संस्थांना शेअर्ससाठी अर्धी रक्कम देणार – बिपिन कोल्हे

Kolhe Factory to pay half amount for shares to A’ Class Co-operative Societies – Bipin Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir22Sep24, 19.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : १५१ नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी  सेवा सहकारी संस्थांना केंद्र सरकारच्या ऑरगॅनिक संघ, राष्ट्रीय बीज सहसमिती व एक्सपोर्ट संघाचे सभासद व्हावे लागणार आहे. त्यासाठी शेअर्स खरेदी करावे लागणार असून, ‘अ’ वर्ग प्राप्त सक्षम सहकारी संस्थेला शेअर्स खरेदीसाठी लागणारी अर्धी रक्कम सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे  कारखाना स्वत: भरेल. तसेच शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी  स्थापनेसाठी मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांना द्यावी लागणारी रक्कमही कारखान्यातर्फे देण्यात येईल अशी घोषणा संजीवनी उद्योग समूहाचे बिपिन कोल्हे यांनी शुक्रवारी (२२) कोल्हे कारखाना कार्यस्थळावर विविध संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव यांना मार्गदर्शन करतांना केली. 

भारतातील बहुतांश शेतकरी अल्प आणि अल्पभूधारक आहेत. या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी वित्त, बाजारपेठ आणि इतर कृषी विषयक सेवांमध्ये त्यांचा प्रवेश सोपा व सुखकर होण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी सहकार मंत्रालयामार्फत ४८ मोठे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याद्वारे सर्व सहकारी संस्थांच्या आर्थिक विकासासाठी व विस्तारासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. या संस्था बळकट करण्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न होत असून  हे दोन्ही संस्थांच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरणारे आहे. विविध १५१ व्यवसाय सुचवले असून,  तालुक्यातील सक्षम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थां व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आर्थिक प्रगती साधावी असे आवाहन त्यांनी केले. 
याप्रसंगी प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी ए. डी. काटे, नाशिक येथील कृषिभूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष भूषण निकम यांनी केंद्र सरकारच्या धोरणानुसार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (पीएसीएस) आणि शेतकरी उत्पादक कंपनी (फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन-एफपीओ) अंतर्गत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी करावयाच्या व्यवसायाची सविस्तर माहिती दिली. 
प्रारंभी बिपीन कोल्हे व मान्यवरांनी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. स्वागत बिपीन कोल्हे  उपाध्यक्ष मनेष गाडे, साहेबराव कदम, संचालक रमेश आभाळे, सतीश आव्हाड यांनी केले. 
यावेळी बहादरपूर सेवा संस्थेचे अध्यक्ष हरिदास राहणे यांचा बिपिन कोल्हे यांनी सत्कार केला सूत्रसंचालन व प्रास्ताविक कारखान्याचे सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी केले.
  यावेळी नानासाहेब गव्हाणे, प्रकाश गोर्डे, अनिल खालकर, देवराम गवळी, साहेबराव शिंदे, साहेबराव पाचोरे, कैलासराव रहाणे, हरीदास रहाणे, अर्जुन गोसावी, रमेशराव आभाळे, शिवाजीनाना गवळी, अण्णासाहेब गुरसळ, कर्णासाहेब वक्ते, दादासाहेब चव्हाण, चिलीया गुरसळ, अशोक पवार, आबासाहेब पवार, सतीश आव्हाड, संजय आभाळे, रंगनाथ उगले, धर्मा शिंदे, काकासाहेब पवार, बाळासाहेब चांडे, चंद्रभान शिंदे, संजय दिघे, काकासाहेब पवार, पांडुरंग पवार, अरुण कदम, कैलास सहाणे, किरण कोळपे, कारभारी कोळपे, भानुदास पानगव्हाणे, पुंजाजी राऊत, शिवाजी चव्हाण, शांताराम कदम, संजय दिघे, यशवंत संवत्सरकर, भाऊसाहेब आढाव, साहेबराव कदम, शशिकांत सोनवणे, धोंडीबा सांगळे, माधव सांगळे, भाऊसाहेब गीते, डॉ. वरकड,आबासाहेब दवंगे, शिवाजीराव दवंगे, सहाणे, निमसे, प्रशांत वाबळे, शंकरराव कदम, शांताराम कदम, माधवराव गोसावी, साहेबराव तिरसे, अण्णासाहेब निकम, साहेबराव सानप, बाळासाहेब सानप, उत्तमराव पाचमोडे, दगुनाथ गायकवाड, रंगनाथअप्पा लोंढे, नारायण लोहकणे, दातीर, केंद्रे, गणेश बारहाते आदींसह तालुक्यातील विविध गावांतील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार कैलास रहाणे यांनी मानले.

चौकट 

चौकट  माजी मंत्री  स्व. शंकरराव कोल्हे यांनी कष्टकरी शेतकऱ्यांच्या  आर्थिक उन्नतीसाठी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकारी संस्थांचे मोठे जाळे निर्माण करून या संस्था नावारूपाला आणल्या. त्याच आदर्श विचारावर संजीवनी  उद्योग समूह शेतकऱ्यांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबवीत आहे,- बिपीन कोल्हे 

Leave a Reply

You cannot copy content of this page