जिनिंग प्रेसिंगने नव्या उद्योगातून रोजगार निर्मितीवर भर द्यावा – आ.आशुतोष काळे
Ginning pressing should focus on employment generation through new industry – A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26Sep24, 18.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :- कर्मवीर शंकरराव काळे यांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच अनेक सहकारी संस्था स्थापन करून सहकाराची बीजे रोवली. सहकारी संस्था चालवितांना काटकसर अत्यंत महत्वाची असून त्याचबरोबर संस्थेच्या प्रगतीचा सातत्याने ध्यास घेवून वाटचाल करणे देखील तेवढेच गरजेचे आहे. जिनिंग प्रेसिंग सोसायटीची प्रगती समाधानकारक असून नवनवीन उद्योग सुरु करून रोजगार निर्मितीवर भर दिल्यास संस्थेची अधिक प्रगती होणार असल्याचा आशावाद आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव तालुका सहकारी कापूस जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संस्थेचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार यांचे अध्यक्षतेखाली पार पडली याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ.मच्छिंद्र बर्डे, सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, दिलीपराव बोरणारे, वसंतराव आभाळे,गोवर्धन परजणे, देवेन रोहमारे, व्यंकटेश बारहाते,अनिल महाले, वीरेंद्र शिंदे, बापूसाहेब जावळे, विजयराव रक्ताटे, देवचंद कडेकर, विजयराव थोरात, मधुकर टेके, दौलतराव मोरे, दिलीपराव शिंदे, विक्रम सिनगर, निवृत्ती शिंदे, संभाजीराव काळे, सुभाष सोनवणे, संचालक सचिन आव्हाड, गणेश गायकवाड, महेश लोंढे, नानासाहेब चौधरी, नानासाहेब निकम, संजय संवत्सरकर, शंकर गुरसळ, पाराजी गवळी, संदीप शिंदे, शिवाजी शेळके, संतोष वर्पे, सौ विमलबाई गवारे,सौ.कांताबाई दहे आदी मान्यवर उपस्थित होते.





