श्रीगोकर्ण गणेश अथर्वशीर्ष ११ सामुदायिक आवर्तन पठण

श्रीगोकर्ण गणेश अथर्वशीर्ष ११ सामुदायिक आवर्तन पठण

Shri Gokarna Ganesh Atharvashirsha 11 Community Recitation

कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग.Participation of girls’ school students.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 26Sep24, 19.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगांव : गावठाण, गणपत चावडी येथील ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश देवस्थान येथे संस्कृत आणि सांस्कृतिक कार्याची अभिवृद्धी उपक्रम अंतर्गत डॉ. सी. एम. मेहता कन्या   विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सामुदायिक अथर्वशीर्षाची ११ आवर्तन पठण केले.

ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश देवस्थान येथे अनेक वर्षापासून श्री गणेश सार्वजनिक उत्सवानिमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण केले जाते. या वर्षीही डॉ. सी. एम. मेहता कन्या मेहता विद्यालयाच्या विद्यार्थिनींचा सहभाग होता. अथर्वशीर्ष पठणानंतर गौरी गणपती फुगडी, परंपरागत रचना विद्यार्थिनींनी सादर केल्या. परंपरागत नऊवार साडी आणि दागिन्यांचा शृंगार शालेय विद्यार्थिनींनी केला होता.

या प्रसंगी ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश देवस्थानचे अध्यक्ष सुभाष महाजन, स्वच्छतादूत व संपर्क प्रमुख सुशांत घोडके, पौरोहित्य प्रदिपशास्री पदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

याप्रसंगी उपस्थित डॉ. सी. एम. मेहता कन्या मेहता विद्यालयाच्या प्राचार्या सौ. प्रमोदिनी शेलार,संस्कृत शिक्षिका सौ. शोभा दिघे,श्रीम. सविता साबळे, सौ. सुनिता वाबळे,सौ. सरिता चोप्रा, दिपक भोये, प्रविण निळकंठ, वेणुगोपाल अकलोड यांचा देवस्थानचे वतीने शाॅल श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ग्रामदैवत गोकर्ण गणेश देवस्थानचे पौरोहित्य प्रदिपशास्री पदे, किशोर काळे,सुनील भावसार, जवाहर गुजराथी, मनोज गायकवाड, हरिश शर्मा, परेश अमृतसर, अनिल भावसार, जयश्री हलवाई, अक्षय काळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी केले

Leave a Reply

You cannot copy content of this page