कोपरगाव उपजिल्हा रुग्णालय व्हावे शंभर खाटांचे – राजेंद्र झावरे

कोपरगाव उपजिल्हा रुग्णालय व्हावे शंभर खाटांचे – राजेंद्र झावरे

कोपरगाव :

कोपरगाव शहर व तालुक्याचा विस्तार मोठा आहे. शहरात एकही मोठे सरकारी रुग्णालय अस्तित्वात नसल्याने खासगी रुग्णालयांकडे रुग्णांना धाव घ्यावी लागते. उपजिल्हा रुग्णालय दुर्धर आजारावर उपचार करणारे प्रसिद्ध रुग्णालय व्हावे अशी अपेक्षा शिवसेनेचे नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी व्यक्त केली ,

कोपरगावात विशेष बाब म्हणून शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय झाल्यास मेडिसीन सर्जरी, ऑपथॅलमिक, बालरोग, त्वचारोग, स्त्रीरोग, अस्थिरोग हे विभाग आपसूक उभारले जातील. कर्मचारी, डॉक्टर आणि निधीही मिळेल. कोपरगावकरांना उत्तम उपचार मिळतील, असा विश्वासही जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी व्यक्त केला.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून रुग्णालयासाठी आवश्यक कर्मचारी, विशेष निधी देऊन विकासाची मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

श्री झावरे म्हणाले, असे हे उपचार खर्चिक असले तरी पर्यायाच्या अभावी शहर तालुक्यातील नागरिकांना महागडी अशी आरोग्यसेवा स्वीकारावी लागते. मात्र, उपजिल्हा रुग्णालयामुळे गरीब व मध्यमवर्गीयांना नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. या रुग्णालयात औषधे व शस्त्रक्रिया करणारे विविध फिजिशियन यांच्यासोबत बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, शल्यचिकित्सक आदी असणार आहेत.

कोपरगाव नगरपालिकेच्या जुन्या दवाखान्याची जागा प्रशस्त असून चांगल्यापैकी इमारत बांधलेली आहे एक दोन कोटी रुपये खर्च करून अद्यावत उपजिल्हा रुग्णालय इमारत व कर्मचारी निवास बांधता येईल, सध्या याठिकाणी नगरपालिकेचे कार्यालय असून लवकरच हे कार्यालय नगरपालिकेच्या नव्या कार्यालय जागेत स्थलांतर होईल. त्यामुळे ही प्रशस्त जागा रिकामी पडणार आहे, सध्या नगरपालिकेचे डॉ.ए. पी.जे. अब्दुल कलाम तिथे कोप-यात रूग्णालय सुरू आहे . असेही झावरे यांनी शेवटी सांगितले

यावेळी उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, विधानसभा संघटक असलम शेख, एसटी सेना अध्यक्ष भरत मोरे, उपशहर प्रमुख कलविंदर दडियाल, युवासेना विक्रांत झावरे, मुन्ना मन्सुरी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page