संजीवनी अकॅडमी : पालक वेबिनार पाल्यांच्या आहार विहार मार्गदर्शन -सौ मनाली कोल्हे यांची संकल्पना

संजीवनी अकॅडमी : पालक वेबिनार
पाल्यांच्या आहार विहार मार्गदर्शन
-सौ मनाली कोल्हे यांची संकल्पना

कोपरगाव :

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी अकॅडमीच्या वतीने
सौ मनाली अमित कोल्हे यांच्या संकल्पनेतून पाल्यांमधिल असलेल्या ऊर्जेला आरोग्य व प्रगतीच्या दृष्टीने योग्य दिशा देण्यासाठी पाल्यांच्या आहार विहार मार्गदर्शन,तज्ञ व्यक्तींचे
पालक वेबिनार आयोजित करण्यात आले होते.

संजीवनी ॲकॅडमीमध्ये पालकांसाठी नेहमीच विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येते. सध्याच्या कोविड १९ लढाई काळात या उपक्रमास पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.

या वेबिनार मध्ये अकोला येथिल प्रसिध्द बालरोग तज्ञ डाॅ. नरेंद्र राठी यांनी सध्याच्या कोरोना विषाणुंपासुन संरक्षण करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, एकमेकांना माणसिक आधार देणे, पौष्टीक आहार कोणता व कसा घ्यावा, फळांचे महत्व व त्यातुन मिळणारे शरीराला विविध व्हिटॅमिन्स, मोबाईलचा वापर, इत्यादी बाबींवर प्रकाश टाकुन पालक व विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

 

तसेच मुंबई येथिल बाॅम्बे हाॅस्पिटल मध्ये कन्सलटंट सायक्ररिस्ट म्हणुन कार्यरत असलेल्या डाॅ. आकांक्षा राठी माहेश्वरी यांनी बालकांमध्ये असलेल्या ऊर्जेबाबत माहिती देवुन , बालकांमध्ये वयानुसार शारीरिक व मानसिक बदल आणि पालकांनी पाल्यांबरोबर कसे वागावे, या बाबत सखोल माहिती दिली. या दोनही तज्ञांनी पालकांच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देत पालकांच्या मनातील अनेक शंकांचे निरसन केले.

संजीवनी अकॅडमीने आयोजीत केलेल्या वेबिनार बध्दल पालकांनी संजीवनी अकॅडमी प्रती चांगल्या प्रतिक्रिया कळविल्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page