श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूल दहावीच्या निकालाचा श्रीगणेशा १०० टक्क्यांनी
९२.२ % कौशल हार्दे पहिला
१७ पैकी १७ पास : ७ विशेष प्राविण्य, १० प्रथम श्रेणीत, तर १५ विद्यार्थी नाईंटी प्लस
वृत्तवेध ऑनलाईन 29 July 2020
By: Rajendra Salkar
कोपरगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे तर्फे मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वी परीक्षेत श्री गणेश शिक्षण संस्था को-हाळे संचलित श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूल दहावीच्या निकालाचा श्रीगणेशा १०० टक्क्यांनी झाला असून ९२.२ % गुण मिळवून कौशल काशिनाथ हार्दे पहिला आला आहे. १७ पैकी १७ विद्यार्थी ऊतीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला यात ७ विद्यार्थी विशेष प्राविण्य, तर १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे संचालक प्राध्यापक विजय शेटे यांनी दिली.
प्रा. विजय शेटे म्हणाले, साई सुनिल याने ८९.६ % गुण मिळवून दुसरा ,शेळके श्रेया नंदकुमार हिने ८८.६०% गुण मिळवून तिसरी , पाळंदे राहुल केशव ८६.६ गुण मिळवून चौथा तर कोतकर साक्षी अरुण व रहाणे प्रसाद रामदास या दोघांनी ८६.४% गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे .
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रा.विजय शेटे, विश्वस्थ भारत शेटे, संदीप चौधरी,रविंद्र चौधरी, प्राचार्य प्रा.रामनाथ पाचोरे,पर्यवेक्षक प्रा.प्रवीण चाफेकर,प्रा.खडांगळे पंकज,प्रा. सुषमा डांगे,प्राचार्य रियाज शेख, उपप्राचार्य प्रवीण दहे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा.बापू पुणेकर यांनी सत्कार केला.
सर्वच १७ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्णे झाले असून निकालामध्ये ७ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १० विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. मराठी या विषयात २ ,हिंदी ३,गणित २,सायन्स २ व सोशल सायन्स मध्ये ६ विद्यार्थ्यानी ९० गुणाच्या पूढे गुण मिळविले.
या सर्व विद्यार्थ्यांना सातत्याने श्रीगणेश पॅटर्न अंतर्गत मार्गदर्शन केले गेले.या पॅटर्नमध्ये बोर्ड अभ्यासक्रमाबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम परिपूर्ण रित्या राबवला जातो. श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलचे प्रा.मनिषा ढगे ,प्रा.नवनाथ हळ्नोर,प्रा.आशा भालेराव, प्रा.चासकर अनिता, प्रा.निलेश औताडे, प्रा.दिलीप दुशिंग यांचे मार्गदर्शन लाभले.