कोपरगाव : शनिवारी एक ऑगस्ट रोजी बकरीद असल्याने दर शनिवारी करण्यात येणारा जनता कर्फ्यू या शुक्रवारी करण्यात येणार असल्याची माहिती पालिका, पोलीस व महसूल प्रशासनाने दिली आहे.
कोपरगाव शहरात कोरोना विषाणू प्रादुर्भाव साखळी खंडित करणेकामी नागरिक व सर्व व्यापारी संघ यांच्या मागणी नुसार प्रशासनाने नियोजित आठवड्यातील प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू (लॉकडाऊन) केलेला आहे. परंतु शनिवारी (१ ऑगस्ट) रोजी बकरी ईद हा सण असल्यामुळे या आठवड्याचा जनता कर्फ्यू शनिवार ऐवजी शुक्रवारी (३१ जुलै) राहणार असल्याने सर्व व्यावसायिक नागरिक व शेतकरी बंधू यांनी याची नोंद घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी केले आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करा, असेही त्यांनी सांगितले आहे.