कोपरगावात ढोल ताशा पथकांची वादन स्पर्धा संपन्न- दहाहून अधिक पथकांचा सहभाग

कोपरगावात ढोल ताशा पथकांची वादन स्पर्धा संपन्न- दहाहून अधिक पथकांचा सहभाग

In Kopargaon Dhol Tasha Bands playing competition concluded – more than ten bands participated

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 27Sep24, 16.30Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव शहरात प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर’वाजवेल तो गाजवेल ढोल-ताशा वादन स्पर्धा- २०२३’  भव्य ढोल ताशा पथकांची वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यात दहाहून अधिक ढोल ताशा पथकाने सहभाग घेत वादन केले.

विवेक कोल्हे यांच्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या यांच्या वतीने ढोल ताशा पथक वादन स्पर्धेचे मंगळवारी (२६) आयोजन करण्यात आले होते.रात्री भरपावसात मोठ्या जल्लोषात पार पडल्या.
कोपरगावात प्रथमच झालेल्या या ढोल-ताशा वादन स्पर्धेत शिवराय तरुण मंडळ, सनी ग्रुप, तुळजाभवानी तरुण मंडळ, हिंदुवाडा तरुण मंडळ, प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ, विजेता तरुण मंडळ, राजगड तरुण मंडळ, क्रांती युवक संघटना, राजमुद्रा प्रतिष्ठान, हत्ती गणपती तरुण मंडळ,या दहा मंडळांनी सहभाग घेतला होता
यामध्ये हिंदुवाडा ढोल ताशा पथकाने प्रथम क्रमांक पटकावला.हत्ती गणपती
ढोल ताशा पथकाने द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक प्रगत शिवाजी रोड ढोलताशा पथक व चौथा क्रमांक राजमुद्रा प्रतिष्ठान ढोलताशा पथक यांनी पटकावला. पहिले पहिल्या व दुसऱ्या पथकाला प्रत्येकी  २१ हजार रुपये तर तिसऱ्या पथकाला  रोख १५ हजार रुपये व चौथ्या पथकाला  रोख १० हजार रुपये व स्मृतीचिन्ह संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेक कोल्हे व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत शहरातील विविध भागातून दहाहून  ढोल ताशा पथके सहभागी झाली होती. एकाच ठिकाणी अनेक ढोल ताशा पथकांच्या वादनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मैदानावर नागरिकांनी गर्दी केली होती. एकाहून एक असे सरस ढोल ताशा पथकांच्या शिस्तीत वैशिष्ट्यपूर्ण लय व तालबद्ध ढोल वादन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण शहर ढोल-ताशा, झांज, घंटा अशा पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटाने व ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेले होते. वादनाने उपस्थितांची मने जिंकली.त्यात युवकांसोबत युवतींचाही लक्षणीय सहभाग होता. परीक्षक म्हणून सौरभ चांगले व शोन थोरात यांनी काम पाहिले. 
यावेळी विवेक कोल्हे म्हणाले, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारी ढोल-ताशा वादनाची पारंपरिक कला जपण्यासाठी तसेच ढोल-ताशा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानने यंदा प्रथमच ‘वाजवेल तो गाजवेल ढोल-ताशा वादन’ स्पर्धेचे आयोजन केले. यापुढील काळातही यापेक्षा भव्य दिव्य खुल्या ढोल ताशा वादन स्पर्धा मोठ्या मैदानावर घेण्यात येतील तसेच संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांबरोबर दहीहंडीसारखे पारंपरिक खेळ तसेच धार्मिक, कला, संस्कृती टिकविण्याचे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले. 
या स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोल-ताशा पथकांचे व स्पर्धा यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व युवा सेवकांचे आभार मानून त्यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचा शुभारंभ अमृत संजीवनी चे अध्यक्ष पराग संधान संजीवनी इन्स्टिट्यूट चे विश्वस्त सुमित कोल्हे योग प्रशिक्षक अभिजीत शहा
   
    स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी रामदास गायकवाड, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, स्वप्निल मंजुळ, आकाश वाजे, सिद्धांत सोनवणे, विशाल गोर्डे, विक्रांत सोनवणे, वासुदेव शिंदे, पंकज कुऱ्हे, स्वराज सूर्यवंशी, सतीश निकम, भैय्या नागरे, स्वराज लकारे, सागर राऊत, प्रशांत संत, कुणाल आमले, मंगेश पवार, संतोष जाधव, राहुल माळी, अजय गायकवाड, अर्जुन मरसाळे, समाधान कुऱ्हे, दिनेश गाडेकर, रवींद्र लचुरे, रुपेश सिनगर, ओम बागुल, नरेंद्र लकारे, दत्तात्रय कोळपकर, समीर खाटीक, इलियास शेख, अनिल जाधव, सिध्दार्थ पाटणकर, वैभव सोळसे, अभिजित सूर्यवंशी, अमोल बागुल, समीर सुपेकर, मोनू म्हस्के आदींसह संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांनी परिश्रम घेतले.
याप्रसंगी  राजेंद्र सोनवणे, विनोद राक्षे,  कैलास जाधव,  स्वप्नील निखाडे,  अविनाश पाठक,  दिलीप घोडके,  अशोक लकारे, शिवाजी खांडेकर, भीमा संवत्सरकर, गोपीनाथ गायकवाड, कैलास खैरे, वैभव आढाव, सुशांत खैरे, प्रसाद आढाव, सतीश रानोडे, अल्ताफ कुरेशी, रवींद्र रोहमारे, खलिक कुरेशी, इलियास खाटीक, फकिर मोहम्मद शेख पैलवान, किरण सुपेकर, चंद्रकांत वाघमारे, विजय चव्हाणके, सागर जाधव, संतोष नेरे, शब्बीर, शफिक सय्यद, एस. पी. पठाण, शंकर बिऱ्हाडे, अनिल जाधव आदींसह भाजप व मित्र पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, युवा सेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट…..

या स्पर्धेत हत्ती गणपती तरुण मंडळाच्या पथकातील हर्षदा किरण सोनवणे या दिव्यांग मुलीने एका हाताने ढोल वाजवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.  जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे तिने दाखवून दिले. विवेक कोल्हे यांनी हर्षदाचे विशेष कौतुक करून तिचा सन्मान केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page