कोपरगावातच शेती महामंडळाच्या जागेत एमआयडीसी सुरू करावी-विवेक कोल्हे
MIDC should be started in Kopargaon in the premises of Agriculture Corporation – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 27Sep24, 15.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातच शेती महामंडळाच्या जागेत एमआयडीसी व्हावी, अशी मागणी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी केली.
बुधवारी (२७) रोजी सकाळी अकरा वाजता कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे वसाहतीची ६३ वी सर्वसाधारण सभा संस्थेच्या मल्टीपर्पज सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यावेळी विवेक कोल्हे अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
अध्यक्षपदाची सूचना हशमभाई पटेल यांनी आणली तर अनुमोदन वसंतराव देशमुख यांनी दिले.
यावेळी व्हाईस चेअरमन मुनीशशेठ ठोळे, संचालक मनोज अग्रवाल, अनिल सोनवणे, केशवराव भवर, पराग संधान, रवींद्र नरोडे, सुकृत शिंदे, पंडित भारुड, रवींद्र आढाव, डॉ. चंद्रशेखर आव्हाड.संजय सातभाई. जितेंद्र शारदा, रोहित वाघ, प्रशांत होन, सोमनाथ निरगुडे, संचालक मंडळ व सभासद हजर होते.
विवेक कोल्हे म्हणाले की, कोपरगाव शहर हे समृद्धी मार्गासह रस्ते, रेल्वे व विमान वाहतुकीची सोय आहे असलेले मध्यवर्ती ठिकाण आहे. कोपरगाव औद्योगिक वसाहतीला मर्यादा आला आल्या आहेत तेंव्हा एमआयडीसीला चालला द्यायची आहे. स्व. शंकरराव कोल्हे यांनी अनेक वर्षांपासून शेती महामंडळाच्या संवत्सर, वारी सावळीविहीर येथे एमआयडीसी व्हावी अशी मागणी केली होती. त्याला तात्कालीन राजकीय विरोधकाकडून विरोधही झाला होता . आज पर्यंत संबंधितांनी केवळ आश्वासने दिली. मात्र, एमआयडीसी झाली नाही. एमआयडीसीचे स्वप्न अपूर्णच राहीले आहे. नव्या उद्योजकांना संधी मिळावी येथील युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने आता कोपरगावच्या एमआयडीसीसंदर्भात सकारात्मक प्रक्रिया सुरू करणार असून, आवश्यक त्या सर्व बाबींची लवकरच पूर्ण करून एमआयडीसी प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केला जाईल. अशी ग्वाही त्यांनी दिले. कोपरगाव एमआयडीसी बाबत सध्या फक्त पेपरला चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे शेती महामंडळाची जमीन असल्यामुळे भूसंपादन करण्याची गरज नाही तालुक्यातील उद्योजकांना बरोबर घेऊन या विषयाला गती देणार असल्याचे सांगून उद्योजकांनी देखील चांगल्या प्रकारची संधी घ्यावी अशी आवाहन त्यांनी यावेळी केले.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले, कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन म्हणून मला पहिली संधी मिळाली. तिथून माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली अपेक्षा खूप पण उत्पन्न मात्र कमी अशी औद्योगिक वसाहतीची स्थिती होती. राजकीय जोडे बाजूला ठेवून काळे कोल्हे विखे अशा विविध विचाराचे विचारधारेचे लोक एकत्रित येऊन आम्ही सात वर्षे खेळीमेळीत कारभार करू शकलो उत्पन्न १७ ते १८लाख रुपये आणि खर्च मात्र २५ ते २७ लाख रुपये थकबाकी २७ लाखाची परंतु वसुली केली. राजकीय दुजाभाव पक्षपात बाजूला ठेवून केवळ वसाहतीचे हित जपले प्लॉटचे स्थलांतर असेल किंवा अनामत रक्कम यात वाढ केली तोंड मिळवणी करण्याचा प्रयत्न केला औद्योगिक वसाहतीसाठी वीज पाणी आणि रस्ते यासाठी सातत्याने प्रयत्न केला विजेचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला पाण्याचाही सुटला आहे यासाठी संवत्सर ग्रामपंचायतची आम्हाला कायमच मदत मिळाली आहे. आता एखादी विहीर केली म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न सुटेल.रस्ते आणि ड्रेनेजसाठी १४ कोटी ५२ लाख १३ हजार ३२४ रुपयाचे नवा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे मुंबईला मंजुरी आहे. आता दिरंगाई करून चालणार नाही. त्यासाठी आपल्या हिश्शाची २५% ३ कोटी ६३ लाख रुपये रक्कम भरावयाची आहे दोन कोटी जमा आहेत. तर एक कोटी ६३ लाख जमा करण्यासाठी प्रति गुंठा सहा हजार रुपये प्रमाणे अनामत पोटी जमा करत आहोत. आत्तापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे राहिलेल्यांनी सुद्धा सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली. आपल्याला नगरपालिकेच्या घनकचऱ्याच्या मागे वसाहतीसाठी जागा मिळाली आहे परंतु ती जागा वर खाली असल्यामुळे प्लॉटिंग करण्यासाठी कोट्यावधीचा खर्च असल्याने सध्या आपण तो विषय बाजूला ठेवला आहे. लवकरच तो प्रश्न सुद्धा मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी संचालक मंडळ व सभासदांच्या वतीने औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांना नवभारत ग्रुपचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी संचालक मंडळाच्या वतीने रविंद्र ठोळे (आदर्श उद्योजक) बालाजी आंबोरे (नव उद्योजक),व रोहीत काले (तालुका नव उद्योजक) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सत्काराला या नवीन उद्योजकांनी उत्तर दिले. व पुरस्काराबद्दल संचालक मंडळाच्या आभार व्यक्त केले.
अहवाल वाचन व्यवस्थापक श्रीकांत लोखंडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक पंडित भारुड यांनी केले. प्रास्ताविक केशवराव भवर यांनी केले. शेवटी आभार संचालक रोहित वाघ यांनी व्यक्त केले.