कोपरगावमध्ये गणपती बाप्पाला उत्साहात निरोप; ८ तास विसर्जन मिरवणूक,
An enthusiastic farewell to Ganpati Bappa in Kopargaon; 8 hours immersion procession,
आमदार काळेसह अधिकाऱ्यांचे ढोलवादन Drumming of officials including MLA Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir 29Sep24, 19.20Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक गुरुवारी (दि. २८) उत्साही वातावरणात व शांततेत पार पडली. विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू झाली ते रात्री बारा वाजेपर्यंत तब्बल ८ तास सुरू होती. मिरवणुकीत एकूण २४ मंडळाचा समावेश होता.
शेकडो घरगुती गणपतींना पुढच्या वर्षी लवकर या अशा भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. भक्तांचा उत्साह शिगेला, घोषणांनी परिसर दुमदुमला, बाप्पाची मिरवणूक पाहण्यासाठी कोपरगावकरांची गर्दी!
कोपरगावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे. या गाण्याने बच्चे कंपनीबरोबरच अबालवृद्धांनाही जणू भुरळ घातल्याचे चित्र यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत बघावयास मिळाले. गाण्यांची मंडळांना मोहिनी, अनेक मंडळांनी बसविला डान्स गाण्यांन लावलं लोकांना वेड
गणेशोत्सवाच्या नऊ दिवसानंतर गुरुवारी दुपारी ४ च्या सुमारास विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. शहरातील मुख्य रस्त्याने व गणपती विसर्जन मार्गे ढोल पथकाच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. काही मंडळांनी देखावे केले होते. काही मंडळांनी ढोल ताशांचे काही मंडळांनी डान्स काही मंडळांनी ऐतिहासिक शस्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली. मिरवणुकीदरम्यान मुख्य रस्त्यावरील अहिंसा चौकामध्ये नगरपालिकेचे स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. रात्री १२ वाजेपर्यंत मिरवणूक सुरू होती. मिरवणुकीत बहुतेक मंडळाचे ढोल ताशा पथक होते. अहिंसा चौकात आलेल्या वेगवेगळ्या मंडळाचे आग्रहास्तव आ. आशुतोष काळे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस अधिकारी यांनी ढोल वादनाचा आनंद घेतला. मिरवणुकीदरम्यान आमदार आशुतोष काळे भाजपचे पराग संधान व पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मंडळाचे स्वागत करून अध्यक्षांची भेट घेऊन अभिनंदन केले. शुभेच्छा दिल्या.
अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी साई देवा मंडळ व अंबिका तरूण मंडळ या दोन मोठे मंडळांनी गणेश विसर्जन केले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गुरुवारी सकाळी ११ वाजता कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा संघटनेच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. यानंतर दुपारी चार वाजेपासून मिरवणुकीने जाऊन प्रगत शिवाजी रोड, न्यू यंग स्टार, नरसिंह प्रतिष्ठान, शिवनेरी तरुण मंडळ, शिवराय तरुण मंडळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना येवला रोड, तुळजाभवानी तरुण मंडळ, हिंदू वाडा तरुण मंडळ, विजेता तरुण मंडळ, मुंबादेवी तरुण मंडळ, हिंदू राजा तरुण मंडळ, टिळक नगर तरुण मंडळ, नवश्या गणपती प्रतिष्ठान, छत्रपती संभाजी महाराज चौक गणेश उत्सव मंडळ, माता वैष्णव देवी ग्रुप, क्रांती युवक संघटना, सनी ग्रुप तरुण मंडळ, राजमुद्रा प्रतिष्ठान, धाराशिव मित्र मंडळ, साई समर्थ प्रतिष्ठान, वास्तव ग्रुप आधी सह मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत भाग घेतला होता
गणेश विसर्जन करण्यासाठी नगरपालिकेने टिळक नगर कॉर्नर छत्रपती संभाजी महाराज चौक गोदावरी पेट्रोल पंप व बस स्टॅन्ड समोर अशा चार ठिकाणी विसर्जन कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले होते तसेच गोदावरी नदीच्या नदीच्या दोन्ही बाजूकडे व गुरु शुक्राचार्य तीर्थ या ठिकाणी विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेने शांताराम मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती.
स्वच्छता सुशांत घोडके यांनी ठिकठिकाणी स्वच्छतेबाबत जनजागृती केली सोमय्या दरवर्षीप्रमाणे सोमय्या कॉलेज कडून एनएसएसच्या विद्यार्थिनींनी आपली सेवा दिली
दरम्यान शिर्डी उपविभागीय अधिकारी संदीप मिटके, तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यासह पोलिसांनी यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
Post Views:
122