गांधी जयंतीच्या दिवशी हनुमाननगरमध्ये गटारीत पडून एकाचा मृत्यू

गांधी जयंतीच्या दिवशी हनुमाननगरमध्ये गटारीत पडून एकाचा मृत्यू

 

On Gandhi Jayanti, one died after falling into a drain in Hanumannagar

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 3 Oct24, 15.20Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहरातील हनुमान नगर येथील तीन फूट गटारीत पडून नाका-तोंडात पाणी जाऊन बुडून मृत्यू झाला.सचिन गहिनीनाथ गजर (वय ३२) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी गांधी जयंतीच्या दिवशी रात्री साडेसात आठ वाजेच्या सुमारास  घरी जात असताना गटारीच्या  पाईपलाईनमध्ये पाय अडकून ते तोंडावर रस्त्याकडेच्या गटारीत पडले. हकिकत अशी, सचिन गजर हे बांधकाम मजूर होते. 

 सोमवारी (२ऑक्टोबर रोजी)   संध्याकाळी १९.५२ वाजेच्या सुमारास किराणा आणण्यासाठी सचिन गजर हे जात असताना  विजेच्या कडकडाटटासह  जोरदार पाऊस पडत होता त्यात लाईट गेल्याने ते गटारीत पडले. या मार्गावरून  जात असताना गल्लीतील नागरिकांना  गटारीत कोणीतरी पडल्याचे दिसले. त्यांनी   सचिन गजर याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले परंतु डॉक्टरांनी तो मृत असल्याचे घोषित केले त्यानंतर शहर पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला.  गटारीत पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याने अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मले, एक मुलगी असा परिवार आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page