मलकापूर अर्बन बँकेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी आझाद मैदानात  आमरण उपोषण सुरू 

मलकापूर अर्बन बँकेतील ठेवी परत मिळाव्यात यासाठी आझाद मैदानात  आमरण उपोषण सुरू 

Fast to death started in Azad Maidan for return of deposits in Malkapur Urban Bank

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 3 Oct24, 15.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : वैयक्तिक व संस्थात्मक ठेवीदारांच्या  ठेवी परत मिळाव्या यासाठी मलकापूर अर्बन बँकेच्या विरोधात २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या दिवशी आझाद मैदान, मुंबई येथे मलकापूर अर्बन बँक ठेवीदार कृती समितीने आमरण उपोषण सुरू केले आहे. 

समितीने  उपोषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, सहकार सचिव यांना पत्र दिले आहे
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात   कृती समितीने म्हटले आहे की,  मलकापूर अर्बन बँकेवर २४ नोव्हेंबर २०२१ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सेक्शन ३५ एसी ची बंधने लादल्यामुळे या बँकेतील १२० नागरी सहकारी पतसंस्थांच्या अंदाजे ३०० कोटी रुपयांच्या तसेच वैयक्तिक ठेवीदारांच्या देखील अडकून पडलेल्या आहेत. मलकापूर अर्बन बँकेचे बँकिंग लायसन्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ५ जुलै २०२३ रोजी रद्द केले आहे. या बँकेवर अवसायक नेमण्याची सूचना सहकार खात्याला केलेली होती .या सूचनेनुसार मा. सहकार आयुक्त यांनी या बँकेवर श्री लहाने (जिल्हा विशेष लेखापरीक्षक) यांची नियुक्ती केलेली होती. परंतु मा. सहकार मंत्री महोदय यांनी या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे या बँकेचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. हि बँक अडचणीतून बाहेर निघण्याची शक्यता धुसर होत आहे. त्यामुळे या बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळण्यासाठी आम्ही २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या दिवशी आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण सुरू केले आहे 
या आमच्या आंदोलनामध्ये खालील मागण्यांचा समावेश आहे-
१) मलकापूर अर्बन बँकेवर अवसायक नेमण्याच्या आदेशाला दिलेली स्थगिती तातडीने उठवण्यात यावी. २) या बँकेवर ठेवीदार पतसंस्थांचे अवसायक मंडळ नेमावे.
 मलकापूर अर्बन बँकेमध्ये शिल्लक असलेली ६६० कोटी रुपयांच्या गुंतवणुकी पैकी डी आय सी जी सी चे देणे असलेली ४०० कोटी रुपयांची रक्कम तातडीने डी आय सी जी सी कडे वर्ग करून उर्वरित २०० कोटी रुपये ठेवीदारांमध्ये वाटण्यात यावे.
 आज पावतो मलकापूर अर्बन बँकेच्या ठेवीदारांच्या ६०० कोटी रुपयांच्या ठेवी देणे आहे. डीआयसीजीसी चे पैसे गेल्यानंतर २०० कोटी रुपयांच्या ठेवी ठेवीदारांना तातडीने परत करण्यात याव्यात व उर्वरित ठेवी परत करण्यासाठी या बँकेच्या स्थावर मालमत्ता तातडीने विकण्यात याव्यात व त्यातून वसूल होणारी रक्कम ठेवीदारांमध्ये तातडीने वाटण्यात यावी व उर्वरित रकमेसाठी या बँकेच्या तोट्याला जबाबदार असणाऱ्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करून त्या रकमां ठेवीदारांमध्ये मध्ये वाटण्यात याव्यात.
 या बँकेच्या कामकाजाची कलम ८८ अन्वये चौकशी करून या चौकशीचा अहवाल जास्तीत जास्त एक महिन्यात प्राप्त व्हावा.  ज्या संचालकांमुळे या बँकेला तोटा झालेला आहे. त्या त्या तोट्याची जबाबदारी त्या त्या संचालकांच्या मालमत्ता जप्त करून, त्या मालमत्ता विकून ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात. मलकापूर अर्बन बँकेच्या असलेल्या स्थावर मालमत्ता तातडीने विकून त्यामधून देखील ठेवणाऱ्यांच्या ठेवीच्या रकमा परत कराव्यात.
या आमच्या मागण्यासाठी आम्ही आतापर्यंत छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी व बुलढाणा येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आंदोलने केलेली आहेत. या आंदोलनाला प्रसंगी बँकेचे चेअरमन चैनसुखजी संचेती यांनी आम्हाला दिलेली कुठली ही आश्वासने पाळलेली नाहीत. तसेच या आमच्या मागण्यांसाठी मा. सहकार आयुक्त व सहकार मंत्री यांच्या अनेक वेळा आम्ही गाठी भेटी घेऊन सुद्धा आमच्या मागण्याची पूर्तता झालेली नाही.तसेच आमच्या मागण्यांबाबत सहकार खात्याने व मलकापूर अर्बन बँकेने अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही 
त्यामुळे आम्हाला उपोषण सुरू करावे लागले आहे या उपोषणामध्ये ठेवीदार पतसंस्था तसेच वैयक्तिक ठेवीदार देखील सहभागी झालेले आहेत याची आपण नोंद घ्यावी. या निवेदनावर महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे तसेच मलकापूर अर्बन बँक ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी व सचिव सुदर्शन भालेराव यांच्या सह्या आहेत

चौकट 

चलो  आझाद….मैदान, चलो  आझाद मैदान. …

राष्ट्रपिता स्वर्गीय महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला वंदन करून उपोषण स्थळाची स्वच्छता  स्वहाताने करून राज्य फेडरेशनचे पदाधिकारी काका कोयटे, डॉ. शांतीलाल शिंगी, सुदर्शन भालेराव यांनी मलकापूर बँके विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. 

Leave a Reply

You cannot copy content of this page