पालिकेच्या गलथान कारभारामुळे गटारीत पडून मजूर तरुणाचा मृत्यू झाल्याने कोपरगाव शहरात तणाव
Tension in Kopargaon town due to the death of a laborer youth who fell into the sewer due to the mismanagement of the municipality
विवेक कोल्हे यांची शिष्टाई; पालिकेकडून मदतीचे आश्वासन, तणाव निवळला !Courtesy of Vivek Kolhe; The promise of help from the municipality, the tension is over!
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTue 3 Oct24, 15.30Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगांव :सोमवारी रात्री हनुमान नगर येथील सचिन गजर या मजूर तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणावरून मंगळवारी सकाळी शहरात तणाव निर्माण झाला ज्या खड्ड्यात सचिन गजर यांचा मृत्यू झाला त्या खड्ड्यात बसून शिवसेनेचे ठाकरे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ठिया आंदोलन सुरू केले त्याच वेळेस एक जमाव याबाबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला या जमावाने मयताच्या वारसाला नगरपालिकेत कायम नोकरीत घ्यावे, दहा लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, तसेच मुख्याधिकारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागण्या जमावाकडून करण्यात आल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी सर्वांना आपल्या दालनात बोलवून चर्चेत सुरुवात केली होती. चार ते पाच तासानंतर ही तोडगा निघेना
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी संदीप मिटके,युवा नेते विवेक कोल्हे, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, सपोनी रोहीदास ठोंबरे, भरत दाते, संजय पवार, मुख्याधिकारी शांताराम गोसावी यासह विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
यावेळी बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, हा राजकीय विषय नाही, कुटूंबातील कर्ता पुरुष अचानक गेल्याने त्या कुटुंबाला जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल ? यासाठी आमचे प्रयत्न आहेत . गेल्या चार तासापासून तिढा मिटत नसल्यामुळे मला आजारी असूनही यावे लागले असेही ते म्हणाले,
विवेक कोल्हे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना म्हणाले, ही चर्चा, भांडण, राजकारण करण्याचा विषय नाही हा एक संवेदनशील विषय असून एका विधवा पत्नीचा व तीन अनाथ झालेल्या मुलांचा व त्यांच्या भवितव्याचा विषय आहे. त्यामुळे इकडे तिकडे न बघता त्यांना सन्मानजनक न्याय मिळवून द्या, गेल्या दोन वर्षापासून दक्षिणेतील मूव्हीप्रमाणे कोपरगाव शहराचे रजनीकांत तुम्ही आहात,सर्व अधिकार पालिकेचे मालक तुम्ही आहात ऑर्डर असो की बिल सही तुमचीच आहे. त्यामुळे तुम्ही फार दिरंगाई करावी असे मला वाटत नाही असा टोला त्यांनी लगावला. समाज व आमची सर्वांची भावना एकच आहे मदतीच्या रूपाने या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी सदर कुटुंबास आर्थिक मदत देण्याबरोबरच सन्मान जनक आर्थिक मदत देण्याबरोबरच मयताचे पत्नीस रोजगार देण्याची ही ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला.
भाजपचे पराग संधान, कैलास जाधव, केशव भवर दत्ता काले, प्रशांत कडू, विजय वाजे, स्वप्निल निखाडे, राजेंद्र सोनवणे, बापू पवार, रवींद्र रोहमारे, अशोक लकारे, बबलू वाणी, जितेंद्र रणशुर, दिनेश कांबळे, वैभव गिरमे, ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख असलम शेख, शहरप्रमुख सनी वाघ, माजी नगरसेवक अनिल आव्हाड, मनोज कपोते, समन्वयक मुन्ना मन्सुरी यासह
एकलव्य आदिवासी परिषद संघटना संस्थापक अध्यक्ष मंगेश औताडे, उपाध्यक्ष किरण गांगुर्डे, नितीन बनसोडे, मेहमूद सय्यद, सोमनाथ म्हस्के, आकाश नांगरे, आदी विविध पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन समोर हजर होते.
चौकट
नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे सचिन गजर या तरुणाचा फुटक्या.. पाईपच्या गटारीत पडून नाहक बळी गेला त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी व त्याच्या वारसाला पालिकेत नोकरी मिळावी या मागणीसाठी ठाकरे सेनेचे माजी शहरप्रमुख भरत मोरे यांनी त्या खड्ड्याजवळ बसून या आंदोलन केले. मुख्याधिकारी गोसावी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर व पोलीस निरीक्षक प्रदीप गोसावी यासह कार्यकर्त्यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भरत मोरे यांनी आपले आंदोलन स्थगित केले, परंतु या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आपण लढतच राहणार असेही त्यांनी यावेळी सांगितले.
Post Views:
384