नवरात्र उत्सवासाठी जुन्या गंगेतील बंद भुयारी मार्ग सुरु करा -स्नेहलता कोल्हे 

नवरात्र उत्सवासाठी जुन्या गंगेतील बंद भुयारी मार्ग सुरु करा -स्नेहलता कोल्हे 

For Navratri festival, start the old Ganges closed subway line -Snehlata Kolhe

नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सूचनाNotice to Municipalities and National Highways Authority

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWed 4 Oct24, 18.00Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव  : नगर मनमाड महामार्गावर   जुनीगंगा चौकात नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी मोठा खर्च करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भुयारी मार्ग बांधला आहे. परंतू हा काम सुरू असल्याने भुयारी मार्ग कायम बंदच असतो. आता नवरात्र उत्सव आल्याने शहरातील महिला व भक्त मोठ्या प्रमाणात पहाटेपासून पायी जुन्या गंगेत दर्शनासाठी नऊ दिवस जात असतात. सध्या या ठिकाणी महामार्ग  असल्याने रस्ता अतिशय  रहदारीचा  झाला आहे. परंतू सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याचा भुयारी मार्गच बंद असल्याने एवढा केलेला खर्चाचा उपयोग शून्य अशी परिस्थीती आहे.अशी टिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनावर माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. 
Hide quoted text
सौ स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, नवरात्रोत्सव सुरू होण्याच्या अगोदर लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे आहे, जेणेकरून माता-भगिनी, भाविक-भक्तांचे हाल होणार नाहीत व त्यांना या भुयारी मार्गाने ये-जा करणे सोयीचे होईल. नवरात्रोत्सव सुरू होण्यापूर्वी भुयारी मार्ग तातडीने दुरुस्ती व व्यवस्थित करून वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाने खुला करावा. तर पालीकेने अखत्यारीत असलेल्या
मोहीनीराजनगर ते जुनीगंगा रस्त्यावरील खड्डे बुजून दुरुस्ती करून रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या कडेला असलेली काटेरी झाडे काढून रस्ता स्वच्छ करावा, पथदिव्यांची दुरुस्ती करून पथदिवे चालू करावीत, ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी भरपूर उजेडाची व्यवस्था करावी. तर मी या रस्त्याने पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत महिला येजा करणार आहेत  त्यामुळे या रस्त्यावर अंधार राहणार नाही याची दक्षता घ्यावी.   त्याचबरोबर या भागात  सुलभ वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करावी, अशी सूचना स्नेहलता कोल्हे यांनी पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासन शांताराम गोसावी यांना केल्या आहेत.
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या सूचना व पत्रकानंतर नगरपालिका प्रशासन व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देवी भक्तांसाठी रस्ता व भुयारी मार्ग खुला करण्यासाठी कामाची सुरुवात
 
चौकट
या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी माननीय श्री बडगुजर साहेब यांच्याशी  भ्रमणध्वनीवरून चर्चा केली असता त्यांनी या मार्गाचे काम अजून सुरू आहे तरीही नवरात्र उत्सव लक्षात घेता हा मार्ग सुरू करण्यात येईल तत्पूर्वी करून मुरूम टाकून हा मार्ग महिला व भावीक देवी भक्तांसाठी खुला करण्यात येईल. त्या दृष्टीने आज दुपारपासूनच कामास सुरुवात झालेली आहे. तशा सूचनाही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. तरीही याबाबतीत काही कमतरता असेल तर तीही नवरात्र उत्सवापूर्वीच पूर्ण केली जाईल अशी ग्वाही त्यांनी  बोलताना दिली. 
 
 

Leave a Reply

You cannot copy content of this page