रस्ता 752-जी, शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त माप घाला- आ. आशुतोष काळे
Road 752-G, add maximum measure to farmer’s tier- A. Ashutosh Kale
बैठक: तहसील कार्यालयात विविध कामांचा आ. आशुतोष काळेंकडून आढावा; प्रशासनाला आवश्यक सूचना
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu5 Oct24, 18.20Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव सावळीविहीर 752 जी रस्त्याबाबत लोकांच्या अडचणी आणि मागण्या लक्षात घेऊन सकारात्मक दृष्टीने अधिकाऱ्यांनी कमी जास्त करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त माप घालून, न्याय द्या, अशा काही आवश्यक सूचना आ. आशुतोष काळे यांनी केल्या
कोपरगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार दालनात गुरुवारी (५) रोजी दुपारी चार वाजता आयोजित आढावा बैठकीत मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रीय महामार्ग सावळीविहीर ते कोपरगाव 752 जी या रस्त्यासह तालुक्यातील विविध कामांचा आढावा घेऊन काही आवश्यक सूचना केल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी माणिकराव आहेर, तहसीलदार संदीप भोसले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे श्री. बडगुजर, भुमी लेख अधीक्षक श्री. संजय भास्कर , अप्पर तहसीलदार विकास गंबरे , भाऊपाटील जाधव, अव्वल कारकून इजगे, आदीसह नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी तालुक्यात सुरू असलेल्या सावळविहीर कोपरगाव 752 जी रस्त्यासंबंधी शेतकऱ्यांचे प्रश्न, सततच्या पावसाची नुकसान भरपाई, शेतातील उच्च दाबाचे विजेचे टावर, सायफन, शेतात साचणारे पाणी, विविध रस्ते शिवरस्ते, खाजगी बांधकामासाठी घेतलेल्या वाळू बाबत झालेले केसेस आदीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी बोलताना आ. आशुतोष काळे म्हणाले या विषयाशी संबंध निगडित आपले काही विषय राहिले असतील तर आपण माझ्याशी संपर्क करा आपल्या विषयासाठी ही मीटिंग होती अडचणी सोडून घ्या, अशी विनंती त्यांनी केली तसेच सरकारशी निगडित प्रश्न बाबत मी स्वतः लक्ष घालणार आहे. त्याचप्रमाणे वाळू संबंधित आलेल्या नोटीसीबाबत आपण पुरावे सादर करून प्रश्न मिटवून घ्यावा, तसेच अधिकाऱ्यांना कमी जास्त करून शेतकऱ्यांच्या पदरात जास्तीत जास्त माप घाला, न्याय द्या रेशन पुरवठा बाबत अनेक तक्रारी असून त्यावर तहसीलदार यांनी स्वतः जातीने लक्ष घालून गांभीर्याने प्रश्न मार्गी लावावा असे त्यांनी शेवटी सांगितले