कोपरगावात शनिवारी रंगणार न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा
New Home Minister Khel Paithani will be played in Kopargaon on Saturday
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu5 Oct24, 18.50Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव :संजीवनी महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील माता भगिनींच्या कला गुणांना वाव देण्यासाठी शनिवार , दि ७ ऑक्टोबर रोजी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धामध्ये आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धामध्ये शहरासह तालूक्यातील महीलांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.
भाजप प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महिला बचत गट यांच्या वतीने कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयात शेजारील अलंकापुरीनगरी येथे शनिवारी(७) रोजी न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संचलन सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर करणार आहेत.तर टीव्ही स्टार बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या संगीतमय कार्यक्रमात गप्पा-गोष्टीबरोबरच उखाणे, तळ्यात मळ्यात व इतर विविध मनोरंजक खेळ, फुगा फोडण्याची स्पर्धा, प्रश्नमंजुषा, गीत, नृत्य, विनोद अशी भरगच्च मेजवानी असणार आहे. या कार्यक्रमात सर्व वयोगटातील महिलांना मोफत प्रवेश राहणार असून, कार्यक्रमस्थळी उपस्थित महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.या कार्यक्रमात विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम बक्षीस फ्रीज, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस मायक्रो ओव्हन, चौथे बक्षीस एलईडी टीव्ही आणि पाचवे बक्षीस मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमात कोपरगाव शहर व तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक संजीवनी महिला स्वयंसहाय्यता महिला बचत गट यांनी केले आहे.
Post Views:
231





