कोपरगाव च्या पूर्व भागाला पालखेडचे पाणी मिळणार- सौ. स्नेहलता कोल्हे
Eastern part of Kopargaon will get water from Palkhed – Mrs. Snehlata Kohle
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेशOrders of Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu5 Oct24, 18.40Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : पावसाअभावी पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्यामुळे कोपरगाव च्या पूर्व भागाला पालखेडचे पाणी मिळणार असल्याची माहिती माजी आमदार कोल्हे यांनी दिली.
कोपरगावच्या पूर्व भागाला पाणी सोडावे अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती आहे. त्यांनी पालखेड विभागाच्या पाणी सोडण्याचे आदेश अधिकाऱ्यांना केले आहेत.
दहेगाव बोलका, पढेगाव, कासली, उक्कडगाव, तिळवणी, शिरसगाव, सावळगाव, करंजी, ओगदी, आपेगाव, गोधेगाव या गावांसाठी चारी नंबर ४५ व ५२ मध्ये पाणी सोडून कोळ नदीवरील बंधारे भरण्याबरोबर बोलकी, आंचलगाव, शिंगणापूर या गावांसाठी नारंदी नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येणार आहे त्यावर फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले असून, पूर्व भागात येत्या दोन दिवसांत पालखेड डावा कालव्याचे पाणी सोडण्यात येणार आहे.
यंदा पावसाळा संपत आला तरी कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील सर्वच पिके वाया गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पालखेड डावा कालव्यातून या बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतरच या गावातील लोकांना पाणी मिळते. नागरिकांची तहान भागते. तसेच या भागातील शेतकरी या कालव्याच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. सद्य:स्थितीत या भागातील विहिरी कोरड्याठाक असून शेतीसाठी पाण्याची नितांत गरज आहे. या भागातील जनतेसाठी पाण्याचा दुसरा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांनी स्नेहलता कोल्हे यांच्याकडे केली होती.
स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. ना देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. येत्या दोन दिवसांत पालखेड डावा कालव्यातून पाणी सोडण्यात येईल, असे कार्यकारी अभियंता भागवत यांनी सांगितले.
Post Views:
92