कोपरगावकरांना सप्तशृंगी मातेच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ 

कोपरगावकरांना सप्तशृंगी मातेच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ 

Kopargaon residents benefit from the darshan of Saptshringi Mata’s fee

चौकाचौकात पूजन- दर्शन Pooja-Darshan at intersections

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTur16 Oct24, 19.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव:आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे  कोपरगाव शहरात सोमवारी (दि.१६) रोजी साधू संतांच्या उपस्थितीत ढोल पथकांच्या निनादात आणि तुतारीच्या आवाजात भव्य दिव्य स्वरुपात आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

यावेळी कोपरगाव शहरातील चौकाचौकात  असंख्य भाविकांनी पालखीचे पूजन करून आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.

 

प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व सौ. चैताली काळे यांच्या पुढाकारातून माजी आमदार अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव मध्ये दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जातो. यावर्षी कोपरगाव तालुक्यातील भाविकांना आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन व्हावे. यासाठी वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुका कोपरगावमध्ये आ. आशुतोष काळे यांनी आणल्या आहेत. या पादुकांचे सर्व भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी या पावन पादुका  शहरातील श्री तुळजाभवानी मंदिर, श्री लक्ष्मीआई माता मंदिर, मुंबादेवी मंदिर, श्री कालिकामाता मंदिर, श्री सप्तश्रृंगी मंदिर व श्री जगदंबा माता मंदिर या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या, आदिशक्ती सप्तश्रुंगी देवींच्या चरण स्पर्श झालेल्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी कोपरगावकरांची एकच गर्दी उसळली होती. या पादुकांची सोमवार (दि.१६) रोजी सायंकाळी ४ वाजता आकर्षकरित्या सजविलेल्या पालखीतून श्री जब्रेश्वर मंदिरापासून कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत भव्य वाजत गाजत शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी आ. आशुतोष काळे व सौ.चैताली काळे यांनी पालखी खांद्यावर घेवून पालखी मार्गस्थ झाली. या पालखीचे चौका-चौकात महिला भगिनींनी पूजन करून पावन पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. कोपरगाव शहरातील सर्व रस्त्यांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

मिरवणुकीत सहभागी झालेल्या लेझीम पथकाने तसेच मुलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून नागरिकांचे वेधून घेतले होते. मुलींनी आदिशक्तीची विविध रूपे साकारून भाविकांना मंत्रमुग्ध करून सप्तशृंगी मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण तयार झाले होते. 

यावेळी  श्री रमेशगिरी महाराज,  परमानंद महाराज, विवेकानंद महाराज, जितेंद्रानंद महाराज,  राजनानंद महाराज,   प्रेमानंद महाराज,  राजेश्वरगिरी महाराज,  शरदानंद महाराज, सौ. पुष्पाताई काळे, श्री सप्तशृंगी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त  अड. दिपक पाटोदकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

चौकट :- मिरवणुकीत सहभागी झालेल्या आ. आशुतोष काळे यांनी प्राचीन शिवकला असलेली पारंपारिक वाद्य संबळ वाजवला.तर सौ. चैताली काळे व वारकऱ्यांसमवेत फुगडी खेळले आणि काठी फिरविण्याचा साहसी खेळ खेळून या मिरणुकीत देहभान विसरून सहभागी झाले होते. सौ. चैताली काळे यांनी देखील आई भगवतीचा देव्हारा डोक्यावर घेवून महिला भाविकांचा उत्साह वाढविला.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page