कोपरगाव  शहरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, दोन जण किरकोळ  जखमी 

कोपरगाव  शहरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद, दोन जण किरकोळ  जखमी 

Leopard imprisoned in Kopargaon city, two persons slightly injured

वनविभागाच्या पाच तासाच्या रेस्क्यू ऑपरेशनला यश ; आ. आशुतोष काळेंकडून जखमींना जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन, वनविभाग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्नेहलता कोल्हे यांच्याकडून अभिनंदन  Forest department’s five-hour rescue operation a success; come Ashutosh Kalen assured to provide more help to the injured, Snehalata Kolhe congratulated the forest department officers and employees.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onTur16 Oct24, 20.10Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शहरात गेल्या दोन तीन दिवसापासून दिमाखात दर्शन देणारा बिबट्या अखेरीस मंगळवारी (१७) रोजी दुपारी पाच तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर वनविभागाने   बिबट्या मादीला पिंजऱ्यात जेरबंद केले. बिबट्याच्या वावरात दोनजण किरकोळ जखमी झाले होते यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

कोपरगाव शहरातील कोपरे मार्ग बस स्थानक बैल बाजार खंदक नाला या परिसरात मुक्त संचार करणा-या  बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी जाळ्या व पिंजरा लावला होता. परंतु, तो हुलकावणी देत होता. अखेरीस मंगळवारी दुपारच्या सुमारास वनविभागाच्या पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर  या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. रविवारी तीन ते चार वाजेच्या सुमारास या बिबट्याने संजय नगर व  कोपरे मार्ग परिसरात प्रथम दर्शन दिले गेल्या दोन-तीन दिवसांपासून सदर बिबट्या याच परिसरात वास्तव्य करून होता परंतु  रात्र होताच दहा अकराच्या सुमारास तो  शहरातील भर वस्तीत एसटी बस आगाराच्या  बाजूने मुक्त संचार करीत होता.  अनेक लोकांनी आरडाओरडा केला.  गाड्यांची लाईट चालू केले, परंतु  त्याचा  बिबट्यावर कोणताही परिणाम होत नव्हता.  मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदर बिबट्या   एचडीएफसी बँकेच्या समोरील झुडपे असलेल्या मोकळ्या कंपाऊंडमध्ये बसला असल्याची लोकांच्या लक्षात आले  ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली.  वन विभागाचे पथक त्या ठिकाणी आले तसेच त्यांनी संगमनेर येथील अति शीघ्र कृती दलालाही  पाचारण केले होते. 
आसपास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये प्रतिभा सोनवणे मॅडम  पी. एस. सोनावणे, वनपरिक्षेत्र अधिकारी  बी. एस. गाढे फोरेस्टर, श्रद्धा पडवळ, वनरक्षक, डी. एन. जाधव वनमजूर, सागर इंदरखे, प्रदीप इंदारखे, समीर सय्यद, प्रमोद गिरी, सर्व कोपरगाव,वनविभाग संगमनेर रॅपिड रिस्पॉन्स टीमचे संतोष एम. पारधी, श्रीकिसन सातपुते, दीपक शिंदे, सुहास उपासणी  हरीचंद्र जोजार, विठ्ठलसिंग जरवलं, दत्तात्रय परबत, रामभाऊ वर्पे, रवींद्र भोगे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांची टीम नगर यांनी सहभाग घेतला होता. 
दरम्यान हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना आमदार आशुतोष काळे तहसीलदार संदीप भोसले पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. ही मादी बिबट्या सुमारे चार ते पाच वर्षे वयाची असून वरिष्ठांच्या निर्देशानुसार तिला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे. दोन-तीन दोन-तीन दिवसांच्या घटनेत दोन नागरिक किरकोळ जखमी झाले – वनविभाग परिक्षेत्र अधिकारी प्रतिभा सोनवणे,  

या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शहरातील जखमी झालेल्या नागरिकांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी आपण प्रयत्न करणार – आ.  आशुतोष काळे

 सुदैवाने बिबट्यामुळे दोन-तीन दिवसात शहरात कुठलीही जीवित हानी झालेली नाही;  परंतु वेळीच या बिबट्याचा बंदोबस्त केला गेला नाही तर अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेंव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी व तहसीलदारांनी वन विभागाला त्वरित बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश द्यावेत आणि नागरिकांना भयमुक्त करावे, – स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

    

Leave a Reply

You cannot copy content of this page