उत्कृष्ट काम: गौतम बँकेला बँको ब्लू रिबन व  बँकिंग फ्राँटियर, दोन पुरस्कार 

उत्कृष्ट काम: गौतम बँकेला बँको ब्लू रिबन व  बँकिंग फ्राँटियर, दोन पुरस्कार 

Outstanding work: Gautam Bank won Banco Blue Ribbon and Banking Frontier, two awards

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWen18 Oct24, 19.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : लघु नागरी सहकारी बँकेच्या गटात राष्ट्रीय पातळीवरील  बँको ब्लू रिबन व  बँकिंग फ्राँटियर हे  दोन  स्वतंत्र पुरस्कार गौतम  बँकेने पटकावले आहेत. बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते यांनी बँकेच्या वतीने हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.

बँकेने ऑडीट वर्ग “अ” व १०० ते २०० कोटी ठेवी असणाऱ्या गटातून सक्षम व चोख कामगिरी केल्याची दखल घेवून बँकेला अविज प्रकाशन चा बँको ब्लू रिबन २०२३ हा पुरस्कार नुकताच  गुजरात राज्यातील दमण येथे प्रदान करण्यात आला आहे.तसेच बँकेला राष्ट्रीय पातळीवरील बँकिंग फ्राँटियर, मुंबई,” या संस्थेचा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार गोवा येथे प्रदान करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने आपल्या कुशल कारभाराच्या जोरावर आजवर अनेक पुरस्कार मिळविले असून सन २०२२-२३ च्या अहवाल सालात नेत्रदीपक कामगिरी केल्यामुळे लघु नागरी सहकारी बँकेच्या गटात गौतम बँकेला राष्ट्रीय पातळीवरील एकाच वेळी दोन स्वतंत्र पुरस्कार मिळाले असल्याची माहिती बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड यांनी दिली आहे.

      कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे संस्थापक मा.खा. कर्मवीर शंकरराव काळे यांनी १९७६ साली गौतम बँकेची स्थापना करून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करून खाजगी सावकारीच्या कचाट्यातून मुक्तता केली. बँकेच्या स्थापनेपासून त्यांनी काटकसरीचा पायंडा व आर्थिक शिस्त लावली आहे. त्यांच्या आदर्श विचारांवर माजी आमदार अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचे चेअरमन, व्हा. चेअरमन व संचालक मंडळ जबाबदारीपूर्वक काम करीत असून बँक नेत्रदीपक कामगिरी कामगिरी करीत आहे. बँकेला आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. 

 बँकेला उत्कृष्ट कारभाराबद्दल एकच वेळी दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल मा. आ. अशोक काळे,  काळे  कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, व्हा. चेअरमन बापूराव  जावळे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड,मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, सर्व अधिकारी, कर्मचारी, आणि सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page