सारेगमपा गायन स्पर्धेक गौरी गावात आली: ब्राम्हणगावात जोरदार स्वागत, ढोल-ताशांसह जंगी मिरवणुक
Saregampa singing competition comes to Gauri village: A grand welcome in Bramhgaon, a warlike procession with drums and cymbals
अंतिम विजेतेपदासाठी भरभरून आशीर्वाद Best wishes for the ultimate title
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onWen18 Oct24, 18.10Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सारेगमपा लिटिल सिंगिंग स्पर्धेत अंतिम फेरीकडे वाटचाल करणारी स्पर्धक गौरी पगारे ही एक कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव या मूळगावी आल्यावर लोकांनी तिचे आई अलका पगारेसह जोरदार स्वागत केले. लिटल चॅम्प गौरीचे चाहत्यांनी जंगी मिरवणूक काढून ढोलताशांच्या गजरात फुलांचे हार घालून स्वागत केले.
ब्राम्हणगावच्या गौरी पगारे हिची झी मराठी वाहिनीवरील ‘सारेगम लिटिल चॅम्प’ या रिअॅलिटी शोमध्ये निवड झाली.ती ब्राह्मणगाव येथील जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी, असून तिची आता अंतिम फेरीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्याबद्दल मंगळवारी (१७ ऑक्टोबर) ब्राह्मणगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरी पगारे, तिची आई अलका पगारे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर जगदंबा माध्यमिक विद्यालयात स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते गौरी पगारे हिचा जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, गौरी पगारे हिचे ‘सारेगम लिटिल चॅम्प’ शोमध्ये अंतिम फेरीतील स्थान निश्चित होऊन तिला विजेतेपद मिळावे, अशी जगदंबा मातेच्या चरणी प्रार्थना करून अलका पगारे यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत मोलमजुरी करून गौरीला शिक्षण देत तिच्या अंगभूत कला गुणांना प्रोत्साहन दिले. त्यांचा त्याग खूप मोठा आहे. गरीब कुटुंबातील गौरीने अल्प वयात मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. कोल्हे कुटुंबीय व संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने त्यांनी गौरीला भरभरून आशीर्वाद दिले. तसेच तिला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा व गायिका सुधा ठोळे, श्रीमती रजनी गुजराथी, निवृत्ती कारभारी बनकर, अशोक येवले, अनुराग येवले, सरपंच बाळासाहेब बनकर, अण्णाप्पा वाकचौरे, विठ्ठलराव आसने, भीमराज सोनवणे, जगन आहेर, संजय वाकचौरे, भागवत वाकचौरे, रामदास आसने, बाळासाहेब आहेर, बाळासाहेब गंगावणे, अरुण महाजन, किशोर आहेर, शरद आहेर, राजेंद्र भोंगळे, पोलिस पाटील रवींद्र बनकर, मुख्याध्यापक वारुळे, शिक्षक आसने, आहेर, सोनावणे, राजपूत, धाकतोडे, संतोष तांदळे, शेळके, माळी, ए. व्ही. आहेर, श्रीमती खुरसने, शिंदे, जेजूरकर, बनकर, तोरणे, गाजरे, अनुसे, बाळासाहेब माळी आदींसह संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक, शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोट
सारेगम लिटिल चॅम्प’ या रिअॅलिटी शोमध्ये एकापेक्षा एक सुरेल गीते गाऊन केवळ गावाचं तालुक्याचा व महाराष्ट्राचा नावलौकिक उंचावणाऱ्या गौरी पगारे या गुणी कलावंत लेकीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे- सौ स्नेहलता कोल्हे माजी आमदार
Post Views:
125