कोपरगाव ग्रामपंचायत निवडणुक: सदस्यांसाठी ६५१ अर्ज दाखल; सरपंचसाठी ९० अर्ज,
Kopargaon Gram Panchayat Elections: 651 applications filed for members; 90 applications for Sarpanch,
रवंदा पोटनिवडणुक : एका जागेसाठी एकच अर्ज, पोहेगाव बुद्रुक ग्रामपंचायत सर्वाधिक १०९ इच्छुक उमेदवार Ravanda By-Election: One Application for One Seat, Pohegaon Budruk Gram Panchayat Maximum 109 Interested Candidates
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onFir20 Oct24, 22.00Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील मुदत संपलेल्या १७ ग्रामपंचायतीमधील १७७ जागांसाठी ६५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते तर १७ सरपंच पदासाठी ९० अर्ज दाखल झाले आहे. रवंदा येथील एका जागेसाठी एक पोटनिवडणूक होत असून एक अर्ज प्राप्त झाला आहे तर पोहेगाव ग्रामपंचायत साठी सर्वाधिक १०९ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली
१६ ऑक्टोबर पासून ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी २० ऑक्टोबरपर्यंत १७७ जागांकरिता ६५१ इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर सरपंच पदाच्या १७ जागांसाठी ९० अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
मतदारसंघात एकूण १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असून, त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील कुंभारी (४८उमेदवारी अर्ज )( ५ सरपंच ), घोयेगाव (२३उमेदवारी अर्ज) (२ सरपंच),ब्राह्मणगाव (३३उमेदवारी अर्ज) (११सरपंच,)वारी (४३उमेदवारी अर्ज) (५सरपंच),कान्हेगाव (३३उमेदवारी अर्ज) (३सरपंच),जवळके (४०उमेदवारी अर्ज) (७सरपंच), धोत्रे (३५उमेदवारी अर्ज)(८ सरपंच ) बोलकी (२५उमेदवारी अर्ज) (२सरपंच), कान्हेगाव (३३उमेदवारी अर्ज) (३सरपंच),सुरेगाव (५७उमेदवारी अर्ज) (७सरपंच), लौकी (१९उमेदवारी अर्ज) (२सरपंच), मुर्शतपूर (३०उमेदवारी अर्ज) (५सरपंच), चांदगव्हाण (२१उमेदवारी अर्ज) (४ सरपंच),दहेगाव बोलका(३८उमेदवारी अर्ज) (३सरपंच), कारवाडी(३३उमेदवारी अर्ज) (५सरपंच), पोहेगाव बुद्रुक (१०९उमेदवारी अर्ज) (७ सरपंच), शहाजापूर (४१उमेदवारी अर्ज) (४सरपंच), मंजूर (२४उमेदवारी अर्ज) (७सरपंच),या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर रवंदा येथील पोट निवडणुकीसाठी एका जागेसाठी एकच अर्ज आला आहे.२३ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते मॅडम यांनी काम पाहिले तर त्यांना अव्वल कारकून साळुंखे मॅडम यांनी सहकार्य केले. रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन निवडणूक अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते
Post Views:
143