महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी ऊर्जा आहे- स्नेहलता कोल्हे
The smile on women’s faces is my energy – Snehlata Kolhe
करंजी ‘होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा’ महिलांचा प्रचंड प्रतिसाद
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat21 Oct24, 15.00Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : जीवनात कितीही अडचणी, संकटे आली तरी खचायचे नाही, घाबरायचे नाही, रडायचे नाही तर हिमतीने लढायचे आणि पुढे जायचे. माऊली, माता या शब्दात खूप मोठी ताकद आहे. स्त्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा मातेचे रूप आहे. महिलांच्या चेहऱ्यावरील हास्य हीच माझी ऊर्जा असल्याचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी करंजी येथील सन्मान नारी शक्तीचा होम मिनिस्टर खेळ मानाच्या पैठणीचा या कार्यक्रमात केले.
या कार्यक्रमात गायक किरण वैराळ तर संगीताची साथ अनिल डोरगे, गोरख कोटमे, भरत जाधव, शुभम जाधव, अनिल गाडेकर, प्रमोद निकम, बाळासाहेब जाधव यांनी चित्रपट गीते, लोकगीते, भक्तिगीते, नृत्य, विनोद, गप्पा-गोष्टीबरोबरच उखाणे, तळ्यात मळ्यात, किसमे कितना है दम, दोरा ओढणे, अभिनय व इतर विविध मनोरंजक कार्यक्रम महिलांसाठी सादर करण्यात आले. निवेदक व सूत्रसंचालक संदीपकुमार जाधव यांनी केले.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता-भगिनींना विरंगुळा व आनंदाचे क्षण मिळावे, त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने खास महिलांसाठी सन्मान नारी शक्तीचा ‘होम मिनिस्टर-खेळ मानाच्या पैठणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन स्त्रीशक्तीचा जागर केला. महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप समाधान वाटले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आदर्श विचारावर संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे व आपण जनसेवेचे व्रत स्वीकारले असून, कोपरगाव मतदारसंघातील विविध प्रश्न सोडविण्यास जनतेने कोल्हे परिवाराला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ज्योती आगवन, छाया भिंगारे, मीनाक्षी भिंगारे, कुसुम आगवन, कल्पना भिंगारे, दीपाली भिंगारे, सुनीता भिंगारे, ईश्वरी भिंगारे, पूनम देसाई, अलका भिंगारे, सरपंच रवींद्र आगवन, ‘देविदास भिंगारे, अरुण भिंगारे, नवनाथ आगवन, अजय भिंगारे, डॉ. सुनील देसाई, संतोष भिंगारे, रुक्मिणी भिंगारे, कविता कापसे, लता डोखे, सुरेखा शिंदे, आराध्या शिंदे, प्रतिभा आगवन, अलका आगवन, निर्मला फापाळे, विमल भिंगारे, मनीषा शहाणे, गायत्री बोठे, सोनाली भिंगारे, सपना जाधव आदींसह करंजी येथील सर्व महिला बचत गट सदस्य, महिला, कार्यकर्ते व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात अर्चना गायकवाड, सोनाली रासकर, जयश्री गायकवाड, मीरा फापाळे या महिला मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या महिलांमधून लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातील भाग्यवान विजेत्या प्रमिला पवार (गॅस शेगडी), शीतलदेवी पंजाबी (मिक्सर), नंदा आगवन (टेबल फॅन), उषा आहेर (इस्त्री), किसनाबाई जाधव (डिनर सेट) यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
चौकट
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन मी काम करत आहे. तुमची साथ कायम माझ्या पाठीशी असू द्या, तुमच्या मदतीसाठी, तुमचे विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे, अशी ग्वाही माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
Post Views:
77