कोपरगाव :आरएसएसच्या महिला विंग राष्ट्रसेविका समितीने पथसंचलन, शस्त्रांचे प्रात्यक्षिक, 

कोपरगाव :आरएसएसच्या महिला विंग राष्ट्रसेविका समितीने पथसंचलन, शस्त्रांचे प्रात्यक्षिक, 

Kopargaon: Women’s wing Rashtrasevika Samiti of RSS organized road march, demonstration of weapons,

स्नेहलता कोल्हे यांनी पुष्पवृष्टी करून केले  स्वागतSnehalata Kolhe welcomed by showering flowers

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun22 Oct24, 18.40Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव:  विजया दशमीच्या पूर्वसंध्येला स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी नवरात्र अष्टमीच्या दिवशी आरएसएसच्या महिला शाखा, राष्ट्र सेविका समितीच्या वतीने रविवारी (२२) सकाळी आठ वाजता शस्त्रपूजन करण्यात आले.

स्वयंसेवकांनी भारत माता आणि समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शस्त्र प्रदर्शनाची परंपरा पाळली.  शस्त्रपूजनानंतर गोदाम गल्ली, दत्त बेकरी, डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर, एस. जी. विद्यालय, श्रीराम मंदिर, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, आठरे बंगला, तहसील कार्यालय, भाजी मंडई या मार्गावरून कोपरगाव शहरात शानदार व शिस्तबद्ध पथसंचलन करण्यात आले.

महिला राष्ट्रसेविका समितीने पवित्र भगव्या ध्वजाच्या साक्षीने गणवेशात आणि पदवेशात घोषाच्या तालावर सेविकांनी एकमेकींच्या पावलांशी पावले जुळवत लयबद्ध पथसंचलन करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका तालात व एका लयीत पथसंचलन करीत ही रॅली छत्रपती संभाजी महाराज चौकात आली, त्यावेळी इथे उपस्थित असलेल्या स्नेहलता कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.व पथसंचलनात सहभागी झालेल्या सर्व सेविका माता-भगिनींचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

उत्तर नगर जिल्हा राष्ट्र सेविका समितीच्या वतीने जिल्हा कार्यवाहिका नीता राशिनकर व तालुका कार्यवाहिका रत्ना पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातून अतिशय जोशपूर्ण वातावरणात शिस्तबद्ध प्रकारे हे पथसंचलन पार पडले.

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव,  शिल्पा रोहमारे, हर्षा कांबळे, श्वेतांबरी राऊत, भाजपचे शहर सरचिटणीस जयेश बडवे, सचिन सावंत, महावीर दगडे, जयप्रकाश आव्हाड, संतोष साबळे, खालिक कुरेशी, अभिजीत भोपे, गणेश जावरे, सतीश नेटारे, वाल्मिक आवारे, नितीन नेटारे आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page