पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन; स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हेंनी केले स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन; स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हेंनी केले स्वागत

Arrival of Prime Minister Narendra Modi at Sai Sansthan Helipad; Snehalata Kolhe and Vivek Kolhe welcomed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu26 Oct24, 19.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी येथे आयोजित विविध कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी गुरूवारी (२६) भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शिर्डी विमानतळावरून साई संस्थान हेलिपॅड येथे आगमन झाल्यानंतर भाजप प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व संजीवनी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्वागत केले. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत करून कोपरगाव मतदार संघातील विविध प्रलंबित विकासकामांबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली.

यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री धनंजय मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. सदाशिव लोखंडे, खा. सुजय विखे पाटील, आ. राम शिंदे, आ. मोनिका राजळे, जिल्हा  बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आदींसह खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, विश्वनेता नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला एक सक्षम, दूरदर्शी, कुशल,  कर्तृत्ववान व समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारे कणखर पंतप्रधान लाभले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी भारताचे नाव जगभरात उंचावले आहे. गेल्या ९ वर्षांत त्यांनी सेवा, सुशासन व गोरगरिबांचे कल्याण यावर भर देत ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ हा मंत्र अवलंबत जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यांनी भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर आणली आहे. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारताची सर्व क्षेत्रात अतिशय वेगाने प्रगती होत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुती सरकार सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांच्या विकासासाठी काम करत असल्याचे सांगून  त्यांनी निळवंडे धरण, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळासह इतर विविध विकासकामे मार्गी लावल्याबद्द्ल कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने सरकारचे मन:पूर्वक आभार मानले.
स्व. शंकरराव कोल्हे व बिपीन कोल्हे यांच्या अथक प्रयत्नामुळे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ११ गावांचा निळवंडेच्या लाभक्षेत्रात समावेश झाला आहे. या धरणाचे पाणी लाभक्षेत्रात पोहोचल्याने हा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. निळवंडेच्या पाण्यासाठी गेल्या पाच दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर यश आले आहे, असेही सौ कोल्हे  म्हणाल्या.

चौकट 

माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी  पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला अतितुटीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यात वळविण्याची योजना शासनाकडे मांडून सातत्याने पाठपुरावा केला. त्याची दखल आज शिर्डी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे. सौ.स्नेहलता कोल्हे, भाजप प्रदेश सचिव

Leave a Reply

You cannot copy content of this page