मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला आमदार काळेंचा भेट देऊन पाठिंबा
Support to the chain hunger strike of the Maratha community by visiting MLA Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu26 Oct24, 19.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मराठा बांधवांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांची आ.आशुतोष काळे यांनी भेट घेवून पाठिंबा दिला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी स्थगित केलेले उपोषण (दि.२५) पासून आंतरवली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. मराठा समाज बांधवांनी कोणतेही उग्र आंदोलन न करता जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून साखळी उपोषण केले जात आहे. कोपरगाव शहरात मराठा समाजाच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला आ. आशुतोष काळे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
यावेळी उपोषणकर्ते अनिल गायकवाड, विनय भगत, अमित आढाव, बाळासाहेब जाधव, माजी नगरसेवक कृष्णा आढाव, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, निखील डांगे, चंद्रशेखर म्हस्के, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, शैलेश साबळे, सचिन गवारे, राजेंद्र आभाळे, रविंद्र राऊत, मनोज नरोडे, बाळासाहेब शिंदे, बबलु वाणी, मंदार पहाडे, आकाश डागा, राजेंद्र जोशी, महेश उदावंत, दिनेश संत आदींसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.