श्रीकांत तिरसे गौतम बँक  व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष                        

श्रीकांत तिरसे गौतम बँक  व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष 

Shrikant Tirse Gautam Bank ChairmanBoard ofManagement

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu26 Oct24, 19.40Pm
By राजेंद्र सालकर

 कोपरगाव : बँकेच्या दैनंदिन कामकाजाव नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन मंडळास रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मान्यता मिळाली असून शनिवारी झालेल्या बैठकीत व्यवस्थापन मंडळाच्या अध्यक्षपदी श्रीकांत तिरसे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

संचालक मंडळाबरोबरच बोर्ड ऑफ मॅनेजमेंट स्थापन करणे आवश्यक आहे. असल्याने  श्रीकांत विठलराव तिरसे, राजेंद्र माणिकराव ढोमसे, शरद रावसाहेब होन, रामराव विठ्ठलराव माळी,अॅड.शिरिषराव लोहकणे या पाच जणांची व्यवस्थापन मंडळावर  निवड करण्यात आली आहे  या व्यवस्थापन मंडळाची पहिली मासिक बैठक  शनिवारी (दि.२१) रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली.

 सभेत श्रीकांत तिरसे   यांच्या  निवडीबद्दल बँकेचे मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे व आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याआहे. 

सदर प्रसंगी बँकेचे चेअरमन सुधाकरराव दंडवते, व्हा.चेअरमन बापूराव जावळे, सर्व संचालक मंडळ सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड तसेच सर्व अधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page