योग्य प्रशिक्षणातून त्यांना सैन्य व पोलिसदलासह इतर क्षेत्रात नोकरीची संधी-बिपीन कोल्हे
With proper training, they can find employment opportunities in other fields including the army and police force
कोल्हे गटात काळेगट कार्यकर्त्यांचा प्रवेश Entry of Kalegat activists into Kolhe group
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu26 Oct24, 19.30Pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : स्व.शंकरराव कोल्हे यांनी आदिवासी व ग्रामीण भागातील तरुणांना योग्य प्रशिक्षण दिल्यास त्यांना सैन्यदल, पोलिस दलासह इतर क्षेत्रात नोकरीची संधी मिळेल या विचारांतूनच शैक्षणिक संस्था उभ्या केल्या.असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी एका कार्यक्रमात केले.
शिंगणापूर गारदानाला परिसरातील अंबिका ग्रुपचे अध्यक्ष सुनील वाघ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (काळे गटाचे असंख्य कार्यकर्त्यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात (कोल्हे गट) प्रवेश केला.त्यावेळी ते बोलत होते.
अंबिका ग्रुपचे अध्यक्ष सुनील वाघ, राजेंद्र जिरे, राजेंद्र सोनवणे, आकाश वाघ, दावल पवार, परसराम गोधे, सुनील माळी, श्रावण जाधव, किरण मोरे, राहुल माळी, मंगेश माळी, प्रकाश वाघ, दीपक गोधे, रवींद्र मोरे, लखन नाईक, विलास मोरे, राहुल आगे, दीपक मोरे, रवींद्र आगे, महेश माळी, आदित्य मोरे, सतीश जिरे, गणेश मोरे, संदीप मोरे, रज्जत सोनवणे, सुनील माळी, संतोष मोरे, संजय गोधे, सागर गोधे, किशोर माळी, तुषार माळी, रामा पवार, नीलेश जिरे, दीपक सोनवणे, मगन मोरे, करण मोरे, सनी मोरे, अनिल म्हस्के, गुरुनाथ मोरे, राजू माळी, विजय माळी, साईनाथ अहिरे, नितीन बर्डे, मारुती अहिरे, दगू जाधव, सूरज वाघ यांनी प्रवेश केला.
याप्रसंगी सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे, अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, शिंगणापूरचे माजी सरपंच भीमा संवत्सरकर, मनोज इंगळे, मंगेश गायकवाड, सतीश निकम, अतुल सुराळकर आदी उपस्थित होते.
बिपीन कोल्हे म्हणाले, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आदिवासी समाज उन्नतीसाठी व आदिवासी समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. यात आदिवासी समाजबांधवांना खावटी कर्ज, गायी, मशिनरीचे वाटप केले. पूर्वी झगडे फाटा येथे आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी आश्रमशाळा सुरू केलेली होती. तेथे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचे पाहून आम्ही आदिवासी समाजातील मुला-मुलींसाठी टाकळी येथे नवीन आश्रमशाळा सुरू करून त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केल्याचे सांगितले .
विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काम करू. त्यांना कायम खंबीर साथ देऊ, असे सुनील वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले. शेवटी राजेंद्र जिरे यांनी आभार मानले.
चौकट
आदिवासी समाजातील मुला-मुलींनी शिक्षण घेऊन प्रगती करावी.माजी आमदार स्नेहलता कोल्हे व कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हेव संजीवनी उद्योग समूहातर्फे त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल – बिपिन कोल्हे, अध्यक्ष संजीवनी उद्योग समूह
Post Views:
76