सोनेवाडी एमआयडीसीला मंजूरी,संजीवनी युवा प्रतिष्ठानचा जल्लोष

सोनेवाडी एमआयडीसीला मंजूरी,संजीवनी युवा प्रतिष्ठानचा जल्लोष

Sonewadi MIDC approved, Sanjeevani Yuva Pratishthan cheered

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 30 Nov23, 14.20Am.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : गेल्या पाच वर्षापासून पाठपुरावा सुरू असलेल्या शेती महामंडळाच्या सावळी विहीर सोनेवाडी पट्ट्यातील शेती महामंडळाच्या पाचशे दोन हेक्टर क्षेत्रावर होणारी औद्योगिक
वसाहत अखेर सोनेवाडी परिसरातच होण्यावर बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले.  असल्याची माहिती संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी गुरुवारी (३०) रोजी दुपारी १ वाजता आमदार माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली.

अधिक माहिती देताना विवेक कोल्हे म्हणाले, तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (२९) रोजी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या भागात एमआयडीसी होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याने युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकासह शहरातील व तालुक्यातील तरुणांनी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक येथे अभिवादन करून फटाके फोडून घोषणा देत पेढे वाटून जल्लोष केला.

सुरुवातीला २०१८ साली तात्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वारी संवत्सर सोनेवाडी येथे शेती महामंडळाची हजारो हेक्टर जागा असून या ठिकाणी औद्योगिक वसाहत करण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहार सुरू केला. त्यानंतर पाठोपाठ संजीवनी युवा प्रतिष्ठान यांनी तालुक्यातील बेरोजगार युवकांच्या वतीने सदर औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरू करून संबंधित जागेचे सातबारा उतारे तात्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे प्रस्ताव निवेदन सादर केले होते शेतीमहामंडळाची जागा नाममात्र पैशात मिळावी यासाठी तात्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर ही पत्र व्यवहार केलेला होता. शेती महामंडळाची ही जागा औद्योगिक वसाहतीसाठी विनामूल्य मिळावी यासाठी तात्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याबरोबरही यांना भेटून पाठपुरावा केला होता. या प्रत्येकांला वेळोवेळी स्मरणपत्रे पाठवली होती.त्यानंतर मोठे सत्तांतर झाल्यानंतर मी माझे प्रामाणिक प्रयत्न सोडले नाहीत.असे विवेक कोल्हे यांनी सांगीतले. संजीवनी युवा प्रतिष्ठानने हा प्रश्न उचलून धरला व सातत्याने त्याचा पाठपुरावा केला गेल्या पाच वर्षात केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणून अखेर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत संजीवनी युवा प्रतिष्ठान बरोबर चर्चा केली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी सदर जमीन वर्ग करावी यासाठी महसूल विभागाला प्रस्ताव देखील पाठविला होता. अखेर ७० कोटीची सोनेवाडी शेती महामंडळाची जमीन उद्योग मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आली. अनेक महिने याबाबत तालुक्यात संभ्रमाचे वातावरण होते. आता मात्र औद्योगिक वसाहत सावळीविहीर सोनेवाडी पट्टा परिसरातच होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या पाठपुराव्याचे फलित म्हणून बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोनेवाडी औद्योगिक वसाहतीच्या शिक्कामोर्तब करण्यात आले. आता आम्ही सर्व युवक तरुण पेढे वाटून व फटाके फोडून या निर्णयाचे जल्लोष सात स्वागत करीत आहोत जल्लोषात स्वागत करीत आहोत असे विवेक कोल्हे पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले,

या भागात हजारो कोटींची गुंतवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे.

सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे समाधान

सदर एमआयडीसीला शिर्डी कोपरगाव औद्योगिक वसाहत असे नाव घेण्यात यावे, त्याचबरोबर आता औद्योगिक वसाहत मंजूर झाली असताना जनतेची दिशाभूल करून विनाकारण यात खोडा घालण्याचे काम कोणी करू नये. चांदेकसारे सज्जा तोडून सावळीविहिरला जोडण्याचा तसा प्रयत्न मंत्री महोदयांनी करू नये, औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांचा एकही गुंठा न घेता युवकांना औद्योगिक वसाहत करण्याचा शब्द दिला होता. तो पूर्ण झाल्याची समाधान आहे. अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सोनेवाडी औद्योगिक वसाहतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या सर्वांचे  संजीवनी युवा प्रतिष्ठान च्या वतीने अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी आभार व्यक्त केले

चौकट
शिर्डी टुरिझम आहे, धार्मिक ऐतिहासिक वारसा आहे कोपरगाव प्रवरानगर संगमनेर हा सर्व परिसर शैक्षणिक हब आहे. शेती महामंडळाची हजारो हेक्टर जागा आहे संवत्सरला वॉटरलेस इंडस्ट्रीज येऊ शकते. स्काय कॅरिडोर जाहीर करा – विवेक कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page