कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार -आ. आशुतोष काळे
Kopargaonkars will show more development expected by -A. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon18 Dec 23, 19.00Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहर विकासासाठी छोट्या-मोठ्या व्यापारी बांधवांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत असल्यामुळे शहर विकासाला चालना देण्यात मोठी मदत झाली असून यापुढील काळात व्यापारी बांधवाच्या सहकार्यातून कोपरगावकरांना अपेक्षित असलेला अधिकचा विकास करून दाखवणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी (१७) रोजी ग्राहक सन्मान योजनेच्या बक्षीस वितरण प्रसंगी बोलताना दिली.आपली खरेदी, आपल्या गावात’ यासाठी मी स्वत: पत्नी सौ. चैताली समवेत आपल्या बाजार पेठेत दिवाळीची खरेदी केली हेही त्यांनी सांगितले.
व्यापारी महासंघ व किराणा असोसिएशनच्या या कार्यक्रमात संगमनेरचे प्रसिद्ध उद्योगपती संजय मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ.आशुतोष काळे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कोपरगाव शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातील बाजारपेठेला उर्जितावस्था मिळवून देण्यासाठी माझे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु असून तुमच्या प्रत्येक हाकेला साद देवून सर्व प्रकारचे सहकार्य दिले आहे व यापुढील काळातही देत राहील त्याबाबत आपण निश्चिंत रहावे. मालपाणी उद्योगाचे उद्योग व्यवसायात मोठे योगदान आहे त्यांचे देखील मार्गदर्शन घेवून कोपरगावच्या बाजारपेठेला फायदा होणार आहे. त्याच बरोबर आपल्या शहर व तालुक्यात देखील अनेक यशस्वी उद्योजक आहेत, त्यांचे देखील आपण मार्गदर्शन घेतल्यास आपली बाजार पेठ फुलण्यास मदत होणार आहे. कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदार संघाला पुन्हा गतवैभव मिळवून देवून तालुक्याची भरभराट हा आपल्या सर्वांचा उद्देश आहे. ‘आपली खरेदी, आपल्या गावात’ या संकल्पनेला व्यापारी बांधवांचे मिळालेले सहकार्य व ग्राहकांचा मिळालेला उस्त्फुर्त प्रतिसाद पाहता आपली वाट सकारात्मक पद्धतीने सुरु असल्याचे दर्शवित आहे. त्यासाठी यापुढील काळातही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा योजना असे प्रयोग राबवावे लागणार आहे. त्यासाठी तुमचे सहकार्य अत्यंत महत्वाचे असून तुम्ही असेच सहकार्य ठेवा येत्या काळात कोपरगावची बाजारपेठ पुन्हा कायमस्वरूपी ग्राहकांनी गजबजलेली राहील व आपला उद्देश साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने सुप्रसिद्ध उद्योजक संजय मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे,सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, तुलसीदास खुबाणी, सचिव धरमचंद बागरेचा, सुधीर डागा, प्रदीप साखरे, अजित लोहाडे, राजेंद्र बंब, राम थोरे, सुमित भट्टड, मोहन उकिरडे, किरण शिरोडे, तुषार घोडके, गुलशन होडे, संदीप राशिकर, पवन डागा, संदीप काबरा, प्रदीप मुंदडा, शाम जंगम आदींसह कृष्णा आढाव, अशोक आव्हाटे, मंदार पहाडे, रमेश गवळी, सुनील शिलेदार, राजेंद्र खैरनार, शैलेश साबळे, गणेश बोरुडे, सोमनाथ आढाव, नारायण लांडगे, संतोष शेजवळ, अनिरुद्ध काळे आदींसह व्यापारी बांधव उपस्थित होते.
चौकट :- ‘.हे स्पर्धेचे युग आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खरेदीच्या स्पर्धेत आपल्याला टिकायचे असेल तर ‘ग्राहक सन्मान योजना’ असे विविध उपक्रम यापुढील काळात देखील राबवावे लागणार आहे.-आ.आशुतोष काळे.