वंचित शेतकऱ्यांनी ‘पीएम किसान’योजना विशेष मोहीमेचा लाभ घ्यावा – स्नेहलता कोल्हे   

वंचित शेतकऱ्यांनी ‘पीएम किसान’योजना विशेष मोहीमेचा लाभ घ्यावा – स्नेहलता कोल्हे

Underprivileged farmers should take advantage of ‘PM Kisan’ scheme special campaign – Snehalata Kolhe

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat16 Dec 23, 19.30Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : ई-केवायसी व इतर कारणांमुळे प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी केंद्र सरकारने ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या ४५  दिवसांच्या विशेष मोहीमेचा  पात्र  वंचित राहिलेल्या  मतदारसंघातील शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आवश्यक बाबींची पूर्तता करून , लाभ घ्यावा असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केले आहे.

विविध कारणांमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारमार्फत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा २ हजार रुपयांप्रमाणे दरवर्षी एकूण ६ हजार रुपये दिले जातात. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली असून, या दोन्ही योजनांतून शेतकऱ्यांना आता दरवर्षी १२ हजार रुपये मिळणार आहेत. ही रक्कम थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा मोठा फायदा होत असल्याचे सांगून स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, 
अजूनही अनेक शेतकरी जमिनीचा तपशील अद्ययावत न केल्याने तसेच बँक खाती आधार संलग्न व ई-केवायसी न केल्यामुळे ‘पीएम किसान’ योजनेपासून वंचित आहेत. त्यांच्यासाठी  सरकारने ६ डिसेंबरपासून गावपातळीवर विशेष मोहीम सुरू केली असून, १५ जानेवारी २०२४ पर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.यासाठी गाव पातळीवरील अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत. यासोबत लाभार्थ्याचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केले असल्याची खातरजमा ते करणार आहेत. पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणी व सर्व त्रुटी दूर करून पात्र शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना योजनेत समाविष्ट करण्यासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने त्रुटी दूर करून आवश्यक बाबींची पूर्तता करावी. याबाबत कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सौ कोल्हे यांनी केले आहे.

चौकट

महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ मिळत नसलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या त्रुटी दूर करून त्यांना लाभ मिळण्यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशा सूचनाही  दिल्या आहेत.- सौ. स्नेहलता कोल्हे

Leave a Reply

You cannot copy content of this page