पोहेगावात इंडियन ओव्हरसीज   बँकेचे एटीएम फोडले; ११ लाख लुटले

पोहेगावात इंडियन ओव्हरसीज   बँकेचे एटीएम फोडले; ११ लाख लुटले

ATM of Indian Overseas Bank was broken in Pohegaon; 11 lakh looted

 पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, मात्र सहा महिन्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात यश मिळालेThe first attempt failed, but six months later the second attempt was successful

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue19 Dec 23, 10.00Am.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : पोहेगावातील ग्रामपंचायत समोर मध्यवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी व्यापारी संकुल असलेल्या  येथील इंडियन ओव्हरसीज  बँकेचे एटीएम फोडून 10 लाख 83 हजार 700 रुपये लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे सदरची घटना मंगळवारी  ता.19 डिसेंबर रोजी पहाटे 2.48 च्या सुमारास ही एटीएम फोडी झाली.

पोहेगावात   कोपरगाव संगमनेर रस्त्यावर ग्रामपंचायत कार्यालयासमोर इंडियन ओव्हरसीज बँकेची शाखा असून शाखेला लागूनच इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम आहे.

या एटीएम मधून 10 लाख 83 हजार 700 रुपये चोरट्यांनी लंपास केले. चेहरे दिसणार नाहीत अशा पद्धतीने मास्क घातले होते एटीएम फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेरा वरती स्प्रे मारला तरीही  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले आहे .
गेल्या सहा महिन्यापूर्वी देखील चोरट्यांनी याच इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम तोडले होते. एटीएम शिंदे वस्तीपर्यंत गोदावरी उजव्या कॅनलच्या कडेल ओढत नेले होते. मात्र त्यांना ते तोडण्यात यश आले नव्हते अखेर काल पुन्हा त्यांनी याच बँकेवर लक्ष करत बँकेचे प्रशासन व पोलिसांच्या नाकावर टिच्चून एटीएम तोडून त्यातील रक्कम पळवली.
एटीएम साठी वॉचमन नसल्याने हे कोणाच्याही लक्षात आले नाही मात्र बँकेशेजारी असलेले जय भद्रा फिटनेस क्लबचे व्यवस्थापक राजेंद्र रोहमारे व बाबासाहेब घेर हे क्लब सुरू करण्यासाठी पहाटे आल्याने त्यांच्या हि बाब लक्षात आली.त्यांनी तात्काळ बँकेचे मॅनेजर बि डी कोरडे, बाबासाहेब खंडीझोड यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. बँकेचे मॅनेजर व  प्रशासन ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना दिली.पोलीस स्टेशनचे उपअधिक्षक संदीप मिटके,पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ व त्यांची सर्व टीम पोहेगांवात दाखल झाली.एटीएम तोडलेल्या घटनेची बारीक  माहिती पोलिसांनी यावेळी घेतली. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे या चोरीचा तपास करण्यासाठी  श्वान पथक पाचारण करण्यात आले होते. 
अशाच पद्धतीने तळेगाव येथीलही बँकेचे एटीएम या चोरट्यानी रात्रीच फोडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी नऊ वाजता पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले श्वान पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रात्री दोन वाजता शिर्डी पोलीस स्टेशनची पेट्रोलिंगची गाडी पोहेगाव वरून गस्त घालून गेली होती. त्यानंतर चोरट्याने हा मोका साधला. पोहेगांवात एटीएम फोडण्याचा या जवळपास पाच घटना झाल्या असून नागरिक पूर्ण भयभीत झाले आहे.
पोहेगांव पोलीस दूर क्षेत्र गेल्या पाच वर्षापासून बंद असल्याने या घटना घडत आहेत असे नागरिकांनी बोलून दाखवले. पोहेगांव पोलीस दूरक्षेत्र सुरू  करण्यासाठी वेळोवेळी आंदोलन उपोषणे करण्यात आली मात्र पोलीस प्रशासनाने यांनी याकडे पुरते दुर्लक्ष केले आहे. यामुळेच अशा घटना वारंवार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.आता तरी शिर्डी पोलीस स्टेशनने पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page