अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्याआढावांची कोल्हेंवर  टीका करण्याची पात्रता नाही – दत्ता काले

अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्याआढावांची कोल्हेंवर  टीका करण्याची पात्रता नाही – दत्ता काले

Reviews yellowed by half a Adhav do not deserve to criticize Kolhen – Datta Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon18 Dec 23, 19.40Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आजचे  पदाधिकारी कृष्णा आढाव  टीका करायला लागलेत कोल्हे यांच्यावर टीका करण्यात त्यांची पात्रता नाही  अशी जहरी टीका भारतीय जनता पक्षाचे  कोपरगाव शहराध्यक्ष दत्ता काले यांनी प्रसिद्धी पत्रकातुन  केली आहे. 

 आढाव यांच्या वयाच्या दुप्पट वयाची कोल्हेंची कारकीर्द आहे. अजून त्यांच्या पदाला एक महिना पुर्ण व्हायचा आहे. पदाची ओळख व्हायची आहे. अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्याप्रमाणे त्यांनी आमचे नेते कोल्हे  यांच्यावर केलेली टीका आम्ही कदापी सहन करणार नाही. शहराला स्वच्छ पाणी मिळवून देणे ही आमदार यांची नैतिक जबाबदारी आहे 
मात्र शहराच्या  अवस्थेचे खापर अधिका-यांच्या माथी फोडून आपली जबाबदारी झटकली आहे.आता जनतेसमोर पालिकेचे अपयश मांडत आहेत. याविरूध्द त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेविरूध्द आंदोलन करणे  म्हणजे ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असा प्रकार झाला आहे.
शहराला गढूळ पाणी देऊन जनतेला आंदोलनाची नौटंकी करून फसवणारे आमदार काळे आणि त्यांचे बगलबच्चे यांच्यात समन्वय नाही हे उघड झालं आहे. स्वतःचे पदाधिकारी हे आमदार काळे हे सत्तेवर आहे तर जाब कुणाला विचारत आहेत हा प्रश्न शहराला पडला आहे.अशी टीका काले यांनी पत्रकातून केली आहे
नगरपालिकेला नियमांतर्गत मिळणाऱ्या विविध निधीवर आमदार काळे गटाकडून नेहमीच हा निधी आम्हीच आणल्याच्या वल्गना केल्या जातात.कोट्यावधी आले तर गेले कुठे ? केवळ स्विय सहायक  विकास घडून येऊन मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात घरा घरात आहे.”टक्के घेतो याची  त्यांचेच कार्यकर्ते खुलेआम चर्चा करतात.तर कृष्णा आढाव यांना कोल्हे यांनी कशी मदत वेळोवेळी केली आहे हे काळे यांनी त्यांना खाजगीत विचारावे. असेही काले यांनी पत्रकात म्हटले आहे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे लोकार्पण कोणी केले नाही हे जगजाहीर आहे.कोल्हे यांनी केलेल्या बसस्थानक,पोलीस स्टेशन,पंचायत समिती इमारत कामांचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते करताना त्यात आपले कवडीचेही योगदान नाही याची जाणीव काळे यांना उरली नसावी.४२ कोटी पाणी योजना अंतिम चाचणी झाल्याशिवाय बिले अदा करू नये असे कोल्हे गटाने सांगूनही कुणाच्या दबावाने ते बिल अदा केले गेले हे उघड असल्याचा आरोपही काले यांनी केला आहे.

चौकट – ज्या पाच नंबर साठवून तलावाचे आमदार काळे गटाकडून वेळोवेळी भांडवल केले जाते मुळात त्या साठवण तलावाच्या जागेसाठी  जमीन मालकांना कारखान्यात नोकरी देऊन  माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनीच पालिकेला जमीन मिळवून दिली  

Leave a Reply

You cannot copy content of this page