कोपरगावात श्रीराम पूजा मंगल अक्षता कलशाची मिरवणूक; संत-मंहत, कोल्हे परिवार सहभागी
Shri Ram Puja Mangal Akshata Kalash Procession in Kopargaon; Saint-Manhat, fox family involved
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir22 Dec 23, 14.30Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातून गुरुवारी (२१) रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री वरद विनायक व श्री दत्त मंदिर परिसरातून श्रीराम पूजा मंगल कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. झांज व ढोल-ताशांचे वादन, श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभूषा परिधान केलेले लहानगे, ‘जय श्रीराम’च्या घोषणा, श्रीरामाची प्रतिमा हातात घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या महिला व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी डोक्यावर कलश घेऊन अशा वातावरणात मिरवणूक पार पडली.या मिरवणूकीत कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी सहभाग नोंदवला.
अयोध्येत २२ जानेवारी रोजी श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशात श्रीराम पूजा मंगल अक्षता कलश दर्शनासाठी आणला जात आहे. मंगल अक्षता कलशातील अक्षतांचे वाटप १ ते १५ जानेवारी दरम्यान घरोघरी करण्यात येणार आहे. श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिनी सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या देव्हाऱ्यातील देवांवर अक्षता वाहून पूजा करून श्रीरामाचा नाम जप करावा, असे आवाहन संत महंत व कोल्हे परीवार यांनी केले आहे.
कलशाचे श्री वरद विनायक व श्री दत्त मंदिरात आगमन झाल्यानंतर विधीवत पूजन करून महाआरती करण्यात आली. येथून निघालेली ही शोभायात्रा छत्रपती संभाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, छत्रपती शिवाजी स्मारक, बिरोबा चौक, शिवाजी रोड, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, पांडे गल्ली, मोदकेश्वर मंदिर, भारत प्रेस रोड, कन्या विद्यालय, एस. जी. विद्यालयमार्गे श्रीराम मंदिराजवळ आल्यानंतर तेथे तिचा समारोप झाला. यावेळी श्रीराम मंदिराचे प्रमुख अमरनाथ लोंगाणी यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. या ठिकाणी स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
ढोल-ताशांचा गजर, जय श्रीराम, प्रभू सियावर रामचंद्र की जय, श्रीराम जय राम जय जय राम, भारतमाता की जय, वंदे मातरम् आदी घोषणांचा गजर, इस्कॉनच्या स्वयंसेवकांनी सादर केलेले ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे,हरे राम हरे राम राम राम हरे हरे’, ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ आदी भजने व डीजेच्या तालावरील श्रीरामलल्लांच्या स्तुतीपर गाण्यांमुळे वातावरण राममय झाले होते. श्रीराम नामाचा अखंड जयघोष करीत उत्साहात निघालेल्या या शोभायात्रेत भगव्या टोप्या घालून सहभागी झालेले रामभक्त लक्ष वेधून घेत होते. शोभायात्रेत महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मिरवणूकीत शोभायात्रेत राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज, प.पू. राघवेश्वरानंदगिरी ऊर्फ उंडे महाराज, प.पू. कैलासानंदगिरी महाराज, आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत निजानंद महाराज, विवेकानंद महाराज, राजानंद महाराज, चंद्रानंद महाराज, राजयोगिनी ब्रह्मकुमारी सरलादीदी, गुरुद्वाराचे मुख्य ग्रंथी बाबा हरजितसिंग आदी संत, महंत सजवलेल्या रथात विराजमान झाले होते.
यावेळी शरद थोरात, विनोद राक्षे, दत्ता काले, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, मंगेश पाटील, विजय वहाडणे, रवींद्र पाठक, विजय वाजे, जयंतीलाल पटेल, अमरनाथ लोंगाणी, कैलास जाधव, सनी वाघ, भैय्या तिवारी, बबलू वाणी, अशोक लकारे, संजय जगदाळे, बापू पवार, गणेश आढाव, शिवाजी खांडेकर, वैभव गिरमे, वैभव आढाव, नारायणशेठ अग्रवाल, महावीर दगडे, दिलीप घोडके, सुशांत घोडके, गोपीनाथ गायकवाड, प्रदीप नवले, सुभाष परदेशी, टेकचंद खुबाणी, संतोष गंगवाल, पप्पूसिंग पोथीवाल, सेवासिंग सहानी, मनिंदरसिंग भाटिया, सनीसिंग पोथीवाल, परमजितसिंग भाटिया, जॅकीसिंग दिगवा, दीपासिंग ठकराल, विनोदसिंग ठकराल, चंदूशेठ पापडेजा, बहादुरसिंग भाटिया, बादलसिंग पोथीवाल,कुकूशेठ सहानी, कलविंदरसिंग दडियाल, मनोज बत्रा, जोगिंदर भुसारी, विजय चव्हाणके, सचिन सावंत, जयेश बडवे, प्रसाद आढाव, सोमनाथ गंगुले, जयवंत जोशी, स्वप्निल मंजुळ, विनायक गायकवाड, जगदीश मोरे, पी. टी. वाणी, विशाल झावरे, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, अजय गांधी, शाम डागा,राजेंद्र घुमर, राकेश काले, डॉ.अनिल जाधव, संदीप निरभवणे, प्रदीप चव्हाण आदींसह भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, रामभक्त व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.