कोपरगावात अक्षदा कलशाचे राष्ट्रवादीकडून जल्लोषात स्वागत

कोपरगावात अक्षदा कलशाचे राष्ट्रवादीकडून जल्लोषात स्वागत

Akshada Kalash welcomed by NCP in Kopargaon

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Fir22 Dec 23, 14.40Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : अयोध्‍या येथील श्रीराम जन्‍मभूमी मंदिरात साधूसंतांच्‍या उपस्‍थितीत मंत्रघोषाच्‍या साक्षीने मंत्रित झालेल्‍या ‘अक्षदा कलशाचे’ गुरुवारी (दि.२१) रोजी कोपरगाव शहरात आगमन होताच  औ ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत सवाद्य मिरवणूक काढून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

श्री क्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात श्रीरामलल्लाच्या शिल्पाची स्थापना होणार असून या भव्यदिव्य सोहळ्याच्या निमित्ताने अयोध्या येथून श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे संपूर्ण देशातअभिमंत्रित केलेला ‘अक्षदा कलश’ पाठविण्यात आला असून या ‘अक्षदा कलशाचे’ कोपरगाव शहरात आगमन होताच आ. आशुतोष काळे यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामाचा जयघोष करत ‘अक्षदा कलशाचे’विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. 

या ‘अक्षदा कलशाचे’ दर्शन घेण्यासाठी कोपरगाव शहरातील चौकाचौकात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी रायुकाँचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव,  विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, हाजी मेहमूद सय्यद, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे,  कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, बाळासाहेब रुईकर, मुकुंद इंगळे, राजेंद्र खैरनार, एकनाथ गंगूले, राजेंद्र जोशी, मनोज कडू, राजेंद्र आभाळे, विकास बेंद्रे, सोमनाथ शिंदे, नितीन शिंदे, संतोष शेजवळ, विजय नागरे, सेवासींग सहानी, चंद्रकांत धोत्रे, हर्षल जैस्वाल, अमोल आढाव, ठकाजी लासुरे, अर्जुन ठुबे, आकाश गायकवाड, रोशन खडांगळे, सौ. भाग्यश्री बोरुडे, भारती शिंपी, शितल लोंढे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page