धारणगाव पाणीपुरवठा योजनेचे काम वेळेत पूर्ण करा; माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची अधिकाऱ्यांना सूचना
Complete the work of Dharangaon water supply scheme in time; Ex-MLA Snehalata Kolhe’s suggestion to the authorities
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon 1Jan 24, 19.20Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील पाच गावासाठीच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम निर्धारित वेळेत निविदेत नमूद केल्यानुसार पारदर्शक पद्धतीने पूर्ण करा, अशी सूचना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना केली.
केंद्र सरकारने जलजीवन मिशनअंतर्गत संयुक्त पाणीपुरवठा योजनेतून धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी २९ कोटी ६२ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, तिचे कामदेखील सुरू झाले आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी स्नेहलता कोल्हे यांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (६ जानेवारी ) रोजी कार्यस्थळावर जावून पाहणी करताना त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली . मतदार संघातील पिण्याच्या पाण्याचा किंवा शेतीच्या पाण्याचा प्रश्न असो स्व. शंकरराव कोल्हे, बिपिन कोल्हे मी स्वतः व विवेक कोल्हे सर्व कोल्हे कुटुंबीयांनी सातत्याने मदतच केली आहे. यापुढेही ‘पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण व्हावे यासाठी आपण सर्व सहकार्य करू. पाणीपुरवठा योजनेच्या कामात कोणताही अडथळा निर्माण झाला, तरी तो सोडवण्यासाठी पुढाकार घेऊ,’ असे आश्वासनही सौ कोल्हे यांनी दिले.
जलवाहिनीच्या कामाचा अनुभव चांगला नाही. त्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला. नवीन पाणी पुरवठा योजनेत देखील अशाच प्रकारे भ्रष्टाचार करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याची गय केली जाणार नाही,’ असा इशारा सौ कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
‘त्यासाठी या योजनेतील तलाव, पाईपलाईन, जलकुंभ व इतर कामे वेगाने पूर्ण करावीत, या पाणीपुरवठा योजनेचे काम दर्जेदार होण्यासाठी सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांनी लक्ष द्यावे. असे
आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
यावेळी दगुराव चौधरी, रमेश घोडेराव, दीपक चौधरी, सरपंच करुणा दीपक चौधरी, उपसरपंच गणेश थोरात, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी शेखर मेटकरी,जयंती सुपर कन्स्ट्रक्शन कंपनीचे शंकर, संदीप चव्हाण, रमाकांत वाकचौरे, संपत वहाडणे, सोपानराव वहाडणे, दीपक सुरे, अंबादास देवकर, संदीप चौधरी, दीपक वाघ आदींसह धारणगाव, जेऊर पाटोदा, मुर्शतपूर, हिंगणी, चांदगव्हाण येथील ग्रामस्थ व कार्यकर्ते
आदी उपस्थित होते.
चौकट
मतदार संघातील अनेक गावातील तहानलेल्या नागरिकांची तहान भागविल्याचे व पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करणाऱ्या महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविल्याचे मला मोठे समाधान आहे.- सौ स्नेहलता कोल्हे, माजी आमदार
Post Views:
85