श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास निमंत्रित साधू-संतांचे आमदार काळे यांच्या हस्ते पूजन
Puja by MLA Kale of saints and saints invited to Sriram Mandir Pranpratistha ceremony
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon15Jan 24, 17.50Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात येत असून अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या पंचक्रोशीतील साधुसंतांचे जनतेच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते जाहीर पूजन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे बुधवारी (१७) रोजी संध्याकाळी करण्यात येणार आहे
यामध्ये श्री क्षेत्र सराला बेटचे ह.भ.प. रामगिरी महाराज व श्री संत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पु.रमेशगिरि महाराज तसेच मतदार संघातील साधू-संतांचे जाहीर कार्यक्रमांमध्ये पूजन करण्यात येणार आहे.
आपल्या देशातील कोट्यावधी भारतीयांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्र मागील पाच शतकानंतर अयोध्येतील भव्य राम मंदिरात २२ जानेवारी रोजी विराजमान होणार आहेत. हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्ण दिन म्हणून लिहिला जाईल या अद्भुत पूर्ण सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी तमाम देशातून विदेशातून अनेक संत महात्म्यांना निमंत्रित करण्यात आले आहे यात आमच्या पंचक्रोशीतील संतांचा समावेश आहे ही आमच्यासाठी गौरवशाली व भूषणावह आहे या आमंत्रित संतांचे पूजन करणे हे आमचे कर्तव्य आहे.
यावेळी इंडियन आयडॉल फेम सुप्रसिद्ध गायिका अंजली गायकवाड देखील या धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सुरेल आवाजात प्रभू श्रीरामाचे गुणगान गाणार आहे.
तसेच सारेगमप लिटिल चॅम्प्स विजेती गौरी पगारे व सुरभी कुलकर्णी या गायिका देखील उपस्थित राहणार आहेत. या या भावपूर्ण पूजन सोहळ्यासाठी तमाम रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात
.