निवडणुकीत गद्दारांना गाडण्याचे  हे वर्ष : रावसाहेब खेवरे

निवडणुकीत गद्दारांना गाडण्याचे  हे वर्ष : रावसाहेब खेवरे

This is the year to bury traitors in elections: Raosaheb Khewre

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon15Jan 24, 17.40Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : शिवसेनेने सर्व काही दिले होते. तरीही मिंधे सेनेत ज्यांनी प्रवेश केला.त्यांनी पक्षासोबत गद्दारी केली.  अशा गद्दारी करणाऱ्या गद्दारांना येणाऱ्या निवडणुकीत गाडण्याचे हे वर्ष असल्याचे आवाहन शिवसेनेचे नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेबरे यांनी कोपरगाव येथे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी केले. अध्यक्षस्थानी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे होते.

रावसाहेब खेवरे पुढे म्हणाले, जिल्ह्यात सगळ्यात पावरफुल कोपरगावची शिवसेना आहे येथील एकही शिवसैनिक शिंदे गटाच्या गळाला लागला नाही हा कट्टर शिवसैनिकांचा तालुका आहे. असे गौरवउद्गार रावसाहेब खेवरे यांनी यावेळी व्यक्त केले.मातोश्री बाहेर आदित्य ठाकरे यांची तासंतास वाट पाहणाऱ्या राहुल नार्वेकर यांनी चुकीचा व अन्यायी निर्णय दिला  असल्याची टीका खेवरे यांनी यावेळी केली.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले कोपरगाव चा पाणी प्रश्न आजही सतावतो आहे मी ४७ कोटी रुपये दिले होते तरीही प्रश्न सुटला नाही आजही आठ दिवसाआड पाणी येते कालव्यासाठी ४५४.१४ कोटी रुपये मंजूर झाले होते त्याचे पुढे काय झाले ?  याचाही छडा लावावा लागणार आहे. या देशातून त्या देशात या राज्यातून त्या राज्यात पाणी कुठेही आणता येऊ शकते मग कोपरगावलाच अडचण का आली ? असा सवालही त्यांनी केला . मला फसविणे माहीत नाही, त्यावेळेस गणीत चुकले हुकले,   आज देशातील असो की, महाराष्ट्रातील राजकारण कोणत्या शिगेला पोहोचले आहे.  यासाठी मतभेद बाजूला ठेवू,  एकीची वज्रमुठ बांधुन, उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ऊभे राहुन  २०२४ची  निवडणूक महत्त्वाची आहे. सर्व निवडणुका जिंकु असा संकल्प करूया असेआवाहन  त्यांनी केले.   सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी महिन्यातील काही दिवस कोपरगाव शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला  देणार असल्याची ग्वाही वाकचौरे यांनी यावेळी दिली.

नितीन औताडे यावेळेस म्हणाले, शिवसेना शाखा या तेथील लोकांच्या अडचणी सोडवण्याचे माध्यम असते. या मुंबईच्या शाखा धर्तीवर संघटनेची बांधणी केल्यास विजय निश्चित आहे. कोपरगाव तालुक्यात शिवसेनेची स्वयंपूर्ण यंत्रणा उभारणार असून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.सामान्यांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्यास त्यांना शिवसेनेच्या स्टाईलने दखल घेण्यास भाग पाडू असा इशारा त्यांनी दिला. मागची निवडणूक साठवण  तलावाच्या नावाखाली  पदरात पाडून घेतली परंतु प्रश्न तसाच आहे तेव्हा पुन्हा एकदा साठवण तलावाच्या मुद्द्यावरच आणखी एक निवडणूक होईल अशी मिश्किल  टीका औताडे यांनी यावेळी केली.
मा.खा. भाऊसाहेब वाकचौरे, जिल्हाप्रमुख  रावसाहेब खेवरे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे शिर्डी मतदान संघ प्रचार प्रमुख सुहास वहाडणे, जिल्हा समन्वयक नितीन औताडे,शहर  उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, ग्रामीण उपजिल्हा प्रमुख श्रीरंग चांदगुडे, तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे, शहरप्रमुख सनी वाघ,शहर संघटक कलविंदर दडियाल, इरफान शेख, रवि कथले, बालाजी गोर्डे, जिल्हा ग्राहक संरक्षक कक्ष मुकुंद सिनगर,  माजी सरपंच संजय गुरसळ,गोंदिया संपर्क प्रमुख मनोज कपोते, शहर समन्वयक कालु अप्पा आव्हाड, अभिषेक आव्हाड, दोडिया संपर्क प्रमुख प्रविण शिंदे, प्रफुल्ल शिंगाडे, आदी सह शिवसैनिक उपस्थित होते
मनोगत श्रीरंग चांदगुडे,  कलविंदर दडियाल मुकूंद सिनगर, सुहास वहाडणे,कैलास जाधव, राजेंद्र झावरे यांनी मनोगते व्यक्त केली.
प्रास्ताविक तालुकाप्रमुख बाळासाहेब रहाणे यांनी  तर सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले शेवटी आभार संजय दंडवते यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page